आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसोटी क्रमवारीत चेतेश्‍वर पुजाराची एका स्‍थानाने घसरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई- आयसीसीच्‍या नव्‍या क्रमवारीत टीम इंडियाचा फलंदाज चेतेश्‍वर पुजाराची एक क्रमांकाने घसरण होऊन तो सातव्‍या स्‍थानी आला आहे. परंतु, क्रमवारीत पहिल्‍या दहा क्रमांकामध्‍ये असलेला टीम इंडियाचा तो एकमेव फलंदाज ठरला आहे. गोलंदाजांच्‍या क्रमवारीत फिरकीपटू रविचंद्र अश्विनने आपले आठवे स्‍थान कायम ठेवले आहे.

पुजाराचे 777 अंक असल्‍याने तो फलंदाजांच्‍या पहिल्‍या दहा जणांमध्‍ये स्‍थान मिळवू शकला आहे. दक्षिण आफ्रिकेचा हाशिम अमला (903 गुण) अग्रस्‍थानी आहे. त्‍यानंतर वेस्‍ट इंडीजचा शिवनारायण चंद्रपॉल आणि दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्सचा नंबर लागतो.