आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुजाराचे शानदार अर्धशतक; याॅर्कशायरचे पुनरागमन, टीमसाठी शानदार ५९ धावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - भारताचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारा सध्या लंडनमध्ये यार्कशायर काउंटी टीमकडून उल्लेखनीय कामगिरी करत अाहे. त्याने झंझावाती फलंदाजी करताना मंगळवारी नाॅटिंघमशायरविरुद्ध शानदार अर्धशतक ठाेकले. त्याच्या धडाकेबाज ५९ धावांच्या बळावर याॅर्कशायर टीमने सामन्यात तीन बाद २२६ धावांची खेळी केली. नाॅटिंघमशायरने पहिल्या डावात केलेल्या ४२८ धावांच्या प्रत्युत्तरात याॅर्कशायरने हे यश दुस-या दिवशी संपादन केले.

यासह चेतेश्वर पुजाराने दमदार पुनरागमन केले. त्याला गत वाेर्सेस्टारशायरविरुद्ध सामन्यात भाेपळाही फाेडता अाला नव्हता. मात्र, अाता त्याने शानदार ५९ धावांची खेळी केली. त्याने तब्बल तीन तास मैदानावर टिकून नाॅटिंघमशायरच्या गाेलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. यादरम्यान, त्याने नऊ चाैकार मारले. याशिवाय त्याने एलेक्स लिससाेबत (१००) दुस-या गड्यासाठी ११६ धावांची भागीदारी केली. मात्र, इंग्लंडचा माजी स्पिनर समीत पटेलच्या चेंडूवर बेन किटने झेल घेतल्याने पुजाराला तंबूत परतावे लागले.मात्र, त्याने केलेली खेळी महत्त्वाची ठरली.