आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chika Amalaha Suspended From Commonwealth Games, Latest News In Marathi

CWG : नायजेरियाची वेटलिफ्टर चिका अमालाहा डोपिंगमध्‍ये दोषी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्लासगो- नायजेरियाची अवघी 16 वर्षांची वेटलिफ्टर चिका अमालाहा ही अमली पदार्थ चाचणीत दोषी आढळल्याने तिला राष्ट्रकुल स्पर्धेतून निलंबित करण्यात आले. विशेष म्हणजे तिने 53 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावल्यानंतर ही चाचणी घेण्यात आली होती. तिच्या चुकीचा फायदा भारताला झाला आहे. आता संतोषी मास्ताला रौप्यपदक तर स्वाती सिंगला कांस्यपदक मिळेल.

चिकाची 25 जुलैलादेखील चाचणी घेण्यात आली होती. त्यातदेखील काही प्रतिबंधित घटक दिसल्याने पुन्हा 30 तारखेच्या स्पर्धेनंतरही तिची चाचणी घेण्यात आली. त्यात दोषी असल्यामुळे तिला निलंबित करण्यात आले.
(फोटोओळ - वेटलिफ्टिंग करताना चिका)
पुढील स्‍लाइडवर पाहा, चिकाची छायाचित्रे...