आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Childhood Coach Rajkumar Sharma Is Heading To England To Help Sort Out The Chinks In Kohli’S Batting

खराब फॉर्ममुळे त्रस्‍त असलेल्या विराटने बालपणीच्‍या कोचला केले इंग्‍लंडमध्‍ये पाचारण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - विराट कोहली )
नवी दिल्‍ली - भारतीय क्रिकेटचा आश्वासक चेहरा म्‍हणून विराट कोहलीकडे पाहिजे जाते. परंतु इंग्‍लंड दौ-यावर तो आपल्‍या लौकिकास साजेशी काम‍गिरी करु शकला नाही. उलट गर्लफ्रेंडला घेऊन इंग्‍लंडमध्‍ये सेलिब्रेशन करत असल्‍याच्या टीकेची झोडही त्याच्यावर उठली आहे. विराटने आधीच्या तिन्ही सामन्‍यात फक्‍त 101 धावा काढल्या. आपलाला पुन्हा लय गवसावी म्हणून विराटने त्‍याच्‍या बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांना इंग्‍लंडमध्‍ये निमंत्रित केले आहे.
इंग्रजी दैनिक 'मेल टूडे'ला दिलेल्‍या मुलाखतीमध्‍ये प्रशिक्षक राजकुमार यांनी म्‍हटले की, व्‍हीसा मिळताच लवकरच आपण इंग्‍लंडला रवाना होणार आहे. विराटचा फार्म सुधारण्यास त्याला योग्य ते मार्गदर्शन करणार आहे.

विराटकडे फलंदाजीचे उत्तम तंत्र जाणतो. परंतु मानसिक असंतुलनामुळे तो आधीच्या तिन्ही सामन्यात लवकर तंबूत परतला. इंग्‍लंडच्‍या मैदानावर विराटने आपल्‍या लक्षापासून विचलित होऊ नये, असेही राजकुमार यांनी सां‍गितले आहे.
दुसरीकडे, विराट कोहलीने इंग्‍लंडचा पार्टटाईम फिरकीपटू मोईन अलीविरुद्ध अधिक आक्रमक व्‍हायला हवे, असे भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने म्‍हटले आहे.

भारताचा माजी सलामीवर फलंदाज चेतन चव्‍हाण म्‍हणाला, विराट इंग्‍लंडमध्‍ये चुकीचा फटका मारल्‍याने बाद झाला आहे. तसेच इंग्लंडच्या उत्‍कृष्‍ट गोलंदाजीपुढेही त्यांला नतमस्तक व्हावे लागले, हेही नाकारता येणार नाही.