आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उधारीच्या पैशावर सुनीलची थाळीफेक, चीनमध्ये होणार अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - एका हाताने अपंग असलेला हरियाणाचा खेळाडू सुनील फोगट एक लाख रुपये उधार घेऊन बीजिंगला (चीन) होणार्‍याआंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रथमच सहभागी होत आहे.
भलोट (रोहतक) येथे राहणारा सुनील एफ 54 कॅटेगरीमध्ये थाळी फेकीचा खेळाडू आहे. सुनीलची स्पर्धेत सहभागी होण्याची इतकी तीव्र इच्छा होती की यासाठी त्याने एक लाख रुपये उधार घेतले. त्याला यासाठी फेडरेशनची मदत मिळाली नाही आणि हरियाणा स्पोर्ट्स डिपार्टमेंटचीसुद्धा नाहीच. पॅरालिम्पिकच्या दोन फेडरेशन असल्याने हरियाणाच्या क्रीडा विभाग मदत करू शकला नाही.
पैशाची व्यवस्था कशी करणार?
सुनील सध्या दिल्लीत असून चीनच्या स्पर्धेसाठी तयारी करतोय. ‘भास्कर’ला दिलेल्या माहितीत सुनील म्हणाला, माझे वडील शेतकरी आहेत. त्यांच्या कमाईनेच घरखर्च चालतो. वडील माझा स्पर्धेचा खर्च उचलू शकत नाहीत. मी त्यांना पैसे कसे काय मागणार? यामुळे मी पैसे उधार घेतले. मला ही संधी सोडायची नव्हती. कारण ही माझी पहिली स्पर्धा आहे. येथूनच मी आशियाई गेम्ससाठी क्वालिफाय करू शकतो.