आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: चीनमध्ये असे तयार होतात चॅम्पियन खेळाडू, क्रूर पद्धतीने दिले जाते ट्रेनिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनमधील लहान मुलांना असे ट्रेनिंग दिले जाते. याचमुळे चीनमध्ये चॅम्पियन खेळाडू तयार होतात व ऑलिंपिकमध्ये ते कायम पहिल्या 5 मध्ये राहतात. - Divya Marathi
चीनमधील लहान मुलांना असे ट्रेनिंग दिले जाते. याचमुळे चीनमध्ये चॅम्पियन खेळाडू तयार होतात व ऑलिंपिकमध्ये ते कायम पहिल्या 5 मध्ये राहतात.
स्पोर्ट्स डेस्क- रिओ ऑलिंपिक गेम्स मागील महिन्यात संपले आणि नेहमीच्या ऑलिंपिकप्रमाणे चीनचा दबादबा यंदाही राहिला. चीनच्या खेळाडूंनी रिओत एकून 70 मेडल जिंकली आणि मेडल टॅलीत तिसरा क्रमांक पटकावला. ही मेडल्स जिंकण्यामागे चीनच्या खेळाडूंची अथक मेहनत तर कामाला आलीच पण त्यांना खूपच कठिण आणि क्रूर पद्धतीने दिले गेलेल्या ट्रेनिंगलाही क्रेडिट जाते. जे लहानपणापासूनच तेथील मुलांना दिले जाते. खूपच त्रासदायक व वेदनादायी असते ट्रेनिंग...
- चीनमध्ये चॅम्पियन खेळाडू तयार करण्यासाठी खूपच लहान वयात तेथील खेळाडूंना ट्रेनिंग देण्यास सुरुवात केली जाते.
- या दरम्यान त्यांना खूपच वेदनादायी आणि कठिण ट्रेनिंगमधून जावे लागते.
- हे ट्रेनिंग एवढे धोकादायक आणि त्रासदायक असते की ते पाहणा-याला धक्का बसतो.
- या ट्रेनिंग दरम्यान लहान मुले रडतात, ओरडतात. एवढेच नव्हे तर त्यांना दुखापतीलाही सामोरे जावे लागते.
- मात्र, चीनमधील कडक नियमामुळे तेथील मुलांना ट्रेनिंग सोडण्याची परवानगी नसते.
- मात्र, मुलांचे पालक त्यांना खुषीने व आनंदाने अशा कठिण ट्रेनिंगला पाठवतात.
- पालकांचे म्हणणे असते की, एवढे कठिण ट्रेनिंग गरजेचे आहे. असे ट्रेनिंग केवळ मुलांनाच मजबूत करीत नाही तर देशाला मेडल जिंकून देते.
निवड प्रक्रियाही असते अतिशय कठिण आणि पारदर्शक-
- या ट्रेनिंगसाठी अशाच लहान मुलांना निवडले जाते जे लहानपणापासून धष्टपुष्ट व मजबूत आहेत.
- ट्रेनिंगदरम्यान या मुलांचे स्नायू (मसल्स) लवचिक राहण्यासाठी त्यांना वेदनादायी एक्सरसाईज करवून घेतले जाते.
- या दरम्यान त्यांना पाय व हाताने संपूर्ण बॉडी बॅलन्स करण्यासाठी खूप त्रास, दु:ख सहन करावे लागते.
- हे ट्रेनिंग पाहणा-याला वाटते की या मुलांवर अन्याय केला जातोय. मात्र, तरीही त्यांना ट्रेनिंग दिले जाते.
- येथे तीन वर्षापासून लहान मुलांना ट्रेनिंगसाठी प्रवेश दिला जातो.
- आजच्या या वृत्तात आम्ही तुम्हाला चीनमधील लहान मुलांना दिल्या जाणा-या टफ ट्रेनिंगबाबत सांगणार आहोत.
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, कसे वेदनादायी ट्रेनिंग पार करावे लागतेस चीनमधील खेळाडूंना...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...