आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑलिम्पिकेचे यजमानपद मिळालेल्या जपानचे अभिनंदन करण्‍यास चीनचा नकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - आगामी 2020 ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद मिळालेल्या जपानचे अभिनंदन करण्यास चीनने नकार दिला. दुस-या महायुद्धादरम्यान सैनिकांच्या केलेल्या छळाबद्दल जपानने माफी मागावी, अशी मागणी चीनने केली. दुसरीकडे जपान आणि चीन यांच्यात सीमावादावरून मागील दशकांपासून वितुष्ट निर्माण झालेले आहे.


चीनच्या प्रसारमाध्यमांनी इस्तंबूलला यजमानपद मिळाल्याची घोषणाही केली होती. चीनचे हांग लेई म्हणाले की, आम्ही आंतरराष्‍ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या निर्णयाचे स्वागत करतो. आम्ही जपानसोबतच्या संबंधांना अधिक महत्त्व देत आहोत. मात्र, मागील काही दिवसांपासून असलेल्या मतभेदांमुळे निर्र्माण होणा-या परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे.


इस्तंबूलचा आनंद औटघटकेचा
टोकियो 2020 च्या ऑलिम्पिक स्पर्धेचा यजमान घोषित होण्याच्या 2 तास आधी एका बातमीने तुर्कीच्या इस्तंबूल शहरात जल्लोषाला उधाण आले होते. ती बातमी होती इस्तंबूलला 2020 च्या ऑलिम्पिकचे यजमानपद मिळाल्याची. लोक एकमेकांचे अभिनंदन करू लागले. तुर्कीच्या पत्रकारांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या हॉटेलबाहेरील मीडिया सेंटरमध्ये जल्लोष सुरू केला. मात्र, हा सारा आनंद औटघटकेचा ठरला. क्षणार्धात हा जोश कुठच्या कुठे विरून गेला. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. यजमानपदाचे दावेदार असलेल्या तीन देशांच्या घोषणेदरम्यान गैरसमज झाल्यामुळे हा घोटाळा झाला.