आशियाई खेळामध्ये झालेल्या टी-20 सामन्यामध्ये चीनचा फिरकीपटू जॉन्ग वेन्यी याने चार चेंडूमध्ये चार विकेट घेतल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यापूर्वी असा विक्रम फक्त श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाच्या नावे आहे. चीन विरुद दक्षिण कोरिया दरम्यान झालेल्या सामन्यामध्ये त्याने हा विक्रम केला.
आशियाई खेळातील क्रिकेटला आयसीसीने मान्यता न दिल्यामुळे हा सामना आंतरराष्ट्रीय प्रकारात गृहीत धरला गेला नाही. पावसाअभावी हा सामना 10-10 षटकांचा खेळवला गेला. जॉन्गच्या शानदार प्रदर्शनामुळे चीनने यजमान संघाला 10 षटकांमध्ये 88 धावांवर रोखले.
मात्र चीन संघ 10 षटकांमध्ये 82 धावाच करु शकला. दक्षिण कोरियाने हा सामना जिंकून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.