आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनच्या यांगची हॅकेटच्या विक्रमाशी बरोबरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बार्सिलोना - ऑलिम्पिक चॅम्पियन चीनच्या सून यांगने विश्व जलतरण स्पध्रेत इतिहास रचताना पुरुषांच्या 400 मीटर फ्रीस्टाइलमध्ये सुवर्णपदक जिंकले. महिला गटात अमेरिकेची खेळाडू कॅटी लेडेकीने सर्वकालीन दुसरा वेगवान वेळ काढला. 22 वर्षीय सूनने विश्व चॅम्पियनशिपमध्ये 400, 800 आणि 1500 मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकून अनोखा रेकॉर्ड केला आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातला दुसरा खेळाडू ठरला आहे.

सूनने ऑस्ट्रेलियाच्या ग्रांट हॅकेटच्या विक्रमाची बरोबरी केली. हॅकेटने 2005 माँट्रियल विश्व जलतरण स्पध्रेत तीन सुवर्णपदके जिंकली होती. चीनचा सून यांगने दोन वर्षांपूर्वी शांघाय येथे 800 व 1500 मीटरमध्ये सुवर्ण जिंकले होते. आता एकाच स्पध्रेत या तिन्ही गटातील सुवर्णपदक जिंकण्याची संधी त्याच्याकडे आहे. असे केल्यास हॅकेटच्या विक्रमाची बरोबरी होईल. सूनने 400 मीटरचे अंतर तीन मिनिट 41.59 सेकंदांत पूर्ण केले. हेगिनोने 3:44.85 सेकंदांसह रौप्यपदक जिकंले.