आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वोत्तम 18 जण निवडणे कठीण; नोब्सचा दावा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बलाढ्य दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या हॉकी मालिकेमुळे भारतीय संघामध्ये सरस कामगिरी करणारे बरेच खेळाडू तयार झाले आहेत. प्रत्येकाच्या कामगिरीचा दर्जा चागंल्याप्रकारे उंचावला आहे. त्यामुळे सर्वोत्कृष्ट खेळी करत विजयश्री सहज खेचून आणण्याचे कसब असलेल्यामधून 18 जणांची ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या संघासाठी निवड करणे जिकिरीचे असल्याचा दावा प्रशिक्षक मायकल नोब्स यांनी केला आहे.
भारतीय संघाने शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची हॉकी मालिका 3-1 ने जिंकली. तिस-या सामन्यातील निराशाजनक कामगिरीत सुधारणा करत भारतीय संघाने चौथ्या सामन्यात पराभवाची परतफेड करत मालिका खिशात घातली आहे.
‘भारतीय हॉकी संघाने सहा महिन्यांत कात टाकली आहे. भारतीय हॉकीपटूंनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या प्रत्येक सामन्यात मोठा विजय मिळवला आहे. तसेच या मालिकेसाठी हरबीर सिंह, एस.के.उथप्पा, कोठाजीत व चिंगेलसेना सिंह या नव्या चेह-यांना संधी दिली होती’, असेही यावेळी नोब्स यांनी म्हटले.