आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला पत्रकारावर ख्रिस गेलची अभद्र टिप्पणी, संघटनांची माफीची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अँटिगा - वेस्ट इंडिजचा स्टार खेळाडू ख्रिस गेलवर महिला पत्रकारावर अभद्र टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेल विरोधात महिला संघटनांनी एकजूट होत माफीची मागणी केली आहे. तर, वेस्ट इंडिज क्रिकेटचे अधिकारी त्याचा बचाव करत आहेत.
गेलचे वादग्रस्त कॉमेंट
कॅरेबियन प्रीमियर लीगच्या (सीपीएल) आधी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला पत्रकाराने स्फोटक फलंदाज ख्रिस गेलला विचारलेल्या प्रश्नावर त्याने अभद्र टिप्पणी केली. महिला पत्रकाराने गेलला विचारले होते, ' हवामान आणि सरावानुसार तुम्हाला खेळपट्टी कशी वाटत आहे?' यावर गेलने पत्रकाराबद्दलच आक्षेपार्ह्य शब्दांचा वापर केला. शेवटी तो म्हणाला, 'मला तुमचे स्मित मात्र खूप आवडले आहे, तुम्ही खूप सुंदर हसता.'
त्याच्या अभद्र टिप्पणीमुळे त्याच्यावर टिकेची झोड उठली असून, महिला संघटनांनी माफीची मागणी केली आहे. वुमन्स अगेन्स्ट रेप या सामाजिक संघटनेने गेलची कठोर शब्दात निंदा केली आहे. तसेच, त्याने माफी मागावी अशी मागणी केली आहे. संघटनेचे प्रमुख वाँग यांनी गेलच्या टिप्पणीवर सीपीएलच्या आयोजकांच्या नरमाईच्या भूमिकवर नाराजी व्यक्त केली आहे. तर, सीपीएल आयोजकांनी गेल महिला पत्रकारासोबत थट्टा - मस्करी करीत असल्याचे सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या उत्तरानंतर त्या पत्रकारही हसल्या होत्या. त्यांना त्या शब्दांचा राग आला होता, किंवा त्यांना ते लागले असे जाणवत नव्हते.
गेल आणि वाद
श्रीलंकेत 2012 मध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्येही गेल त्याच्या कारनाम्यांमुळे वादात अडकला होता. कोलंबोमध्ये तो ज्या हॉटेलमध्ये थांबला होता, तिथे त्याच्या रुममध्ये तीन ब्रिटीश महिला अढळल्या होत्या. स्थानिक पोलिसांनी विनापरवानगी हॉटेलमध्ये आल्या प्रकरणी त्या तिघींना अटक केली होती. हॉटेलच्या रुममध्ये गेलसोबत आंद्रे रसेल आणि ड्वेन स्मिथ तीन ब्रिटीश महिलांसोबत पार्टी करत होते.
आयपीएलमध्ये शर्लीन चोप्रोसोबत पार्टी
2010 च्या आयपीएलमध्ये गेल बॉलिवूड मॉडेल शर्लीन चोप्रोसोबत कोलकत्याच्या एका बारमध्ये अश्लिल नृत्य करताना दिसाल होता. शर्लीन आणि गेल क्लोज डान्स करत होते. त्यावेळी मुरली कार्तिक आणि इशांत शर्माही उपस्थित होता.
पार्टी अॅनिमल
ख्रिस गेलला पार्टी करायला आवडते. इंस्टाग्रामवर तो नेहमी महिलांसोबतच्या पार्टीचे फोटो पोस्ट करत असतो.
पुढील स्लाइड्सवर पाहा, गेलने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेले फोटो

संग्रहित छायाचित्र - जमैकाचा फुटबॉलर रहीम स्टर्लिंग (मध्यभागी) आणि इतर सहकार्‍यांसह पार्टी करतना ख्रिस गेल.