आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुफानी गेलपुढे श्रीलंका ‘फेल’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

किंगस्टन - वेस्ट इंडीजने तिरंगी मालिकेच्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेला 6 गड्यांनी पराभूत करून शानदार सुरुवात केली. यजमान संघाने स्पर्धेतील पहिला सामना 38 व्या षटकातच जिंकला. क्रिस आणि फिरकीपटू सुनील नरेन हे दोघे विंडीजच्या संघाच्या या विजयाचे हीरो ठरले. ‘मॅन ऑफ द मॅच’ गेलने (109) तुफानी शतक ठोकले आणि सुनील नरेनने (4/40) चार गडी बाद केले.
सबिना पार्कवर शुक्रवारी झालेल्या सामन्यात सर्वकाही वेस्ट इंडीजच्या मर्जीप्रमाणे घडले. विंडीजने टॉस जिंकून श्रीलंकेला प्रथम फलंदाजीस बोलावले. पाहुण्या संघाचे फलंदाज कॅरेबियन गोलंदाजांसमोर अपेक्षेनुसार कामगिरी करू शकले नाहीत. सुनील नरेनच्या फिरकीच्या बळावर वेस्ट इंडीजने श्रीलंकेला 49 व्या षटकात 208 धावांत गुंडाळले. श्रीलंकेकडून सलामीवीर महेला जयवर्धने (52) आणि कर्णधार अँग्लो मॅथ्यूज (55) यांनी अर्धशतके ठोकली.
यानंतर क्षेत्ररक्षणादरम्यान श्रीलंकेला कॅरेबियन तुफानाचा सामना करावा लागला. गेलने तुफानी फलंदाजी करून अवघ्या 89 षटकांत शतक ठोकले. त्याने एकट्याच्या बळावर वेस्ट इंडीजचा विजय निश्चित केला. वनडेतील हे त्याचे 21 वे शतक ठरले. गेलने आपल्या खेळीत 100 चेंडूंचा सामना करताना 7 उत्तुंग षटकार आणि 9 चौकार मारून 109 धावा काढल्या.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका : 208 (जयवर्धने 52, अँग्लो मॅथ्यूज 55, 4/40 सुनील नरेन), पराभूत विरुद्ध वेस्ट इंडीज : 4/209 (क्रिस गेल 109, जॉन्सन चार्ल्स 29, डॅरेन ब्राव्हो 27).
सामनावीर : क्रिस गेल.