Home | Sports | From The Field | chris gayle honoured cricketer of the year

विंडीजचा ख्रिस गेलच यंदाचा क्रिकेट ऑफ द इयर!

agency | Update - Jun 07, 2011, 11:45 AM IST

मागील दशकापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानावर आपल्या वैशिष्ट्यपूर्णखेळीच्या बळावर ख्रिस गेलने आपली वेगळी ओळख निर्माण केली.

 • chris gayle honoured cricketer of the year

  मागील दशकापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानावर आपल्या वैशिष्ट्यपूर्णखेळीच्या बळावर ख्रिस गेलने आपली वेगळी ओळख निर्माण केली. ब्रायन लारापाठोपाठच वेस्ट इंडीज संघाच्या नावलौकिकास साजेशी खेळी करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी गेलने बजावली. मागील अध्र्या दशकापासून गेलच्या कामगिरीमध्ये झपाट्याने वेग आला. त्यामुळेच आयपीएलच्या विश्वातही गेलने नेत्रदीपक कामगिरी साधली. याच कर्तृत्वाच्या बळावर गेलने डब्ल्यूआयसीएच्या वतीने देण्यात येणार्‍या दोन पुरस्कारांचा मानकरी ठरला आहे.

  ख्रिस गेल
  यंदाच्या आयपीएल टी-20 ला विंडीजच्या गेलने झंझावाती खेळीने गाजवून सोडले. 12 सामन्यांतून धडाकेबाज खेळीच्या बळावर गेलने सर्वाधिक 619 धावाही काढल्या आहेत. त्यामुळेच गेल यंदाच्या टी-20चा 'हीरो' ठरला; पण आयपीएलच्या खेळीमुळेच दुखावल्या गेलेल्या विंडीज क्रिकेट बोर्डाने गेलला राष्ट्रीय संघातील स्थान नाकारले. मात्र, आपल्या वर्षभरातील कामगिरीच्या बळावर गेलने 'क्रिकेट ऑफ द इयर'व डब्ल्यूआयपीएच्या वतीने दिला जाणारा 'टेस्टमॅच प्लेयर ऑफ द इयर'चाही बहुमान पटकावला.

  मातब्बरांचा फ्लॉप ‘शो’!
  वेस्ट इंडीज संघामध्ये इमानेइतबारे कामगिरी करत असलेल्या चंद्रपाल, सुलीमन व किमर रोचचा ‘शो’ फ्लॉप ठरला. या त्रिकुटावर कुरघोडी करून गेलने यंदाच्या दोन्ही सर्वोत्कृष्टक्रिकेटपटूंचा बहुमान पटकावण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी केली.

  बराथचे आभारी..!
  जुना मित्र एड्रियन बराथ यांचा मी फार आभारी आहे. मित्र या नात्यानेच बराथने आपल्याला वेळोवेळी संकटात योग्य ती मदत केली. त्यामुळेच आज मला हे मोठे यश गाठता आले. अमूल्य मार्गदर्शनामुळे ध्येय गाठण्याचे बळ माझ्यात आले.

Trending