आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Chris Gayle Included In West Indies One Day Cricket Team

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ख्रिस गेलचा वनवास संपला ! 14 महिन्‍यानंतर विंडीज संघात समावेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिजटाऊन - वेस्ट इंडीजचा आक्रमक सलामीवीर ख्रिस गेलचा वनवास अखेर संपला आहे. गेल्या प्रदीर्घ काळापासून कॅरेबियन क्रिकेट बोर्डाबरोबर सुरू असलेला त्याचा वाद अखेर संपुष्टात आला असून, विंडीजच्या वनडे संघात त्याचे पुनरागमन झाले आहे. तब्बल 14 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर गेलने विंडीज संघात पुनरागमन केले आहे.
एका रेडिओला दिलेल्या मुलाखतीत गेलने विंडीज क्रिकेट मंडळावर टीका केली होती. तेव्हापासून त्याच्यात आणि बोर्डात वाद सुरू झाले. अखेर त्याने पुन्हा संघात स्थान मिळवले आहे. इंग्लंडविरुद्ध येत्या 16 जूनपासून सुरू होत असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत तो खेळणार आहे. सेंट विसेंट येथे मंडळाच्या झालेल्या बैठकीत ख्रिस गेलच्या पुनरागमनाबाबत निर्णय घेण्यात आला.
गेलचा एजंट मायकेल हॉलने सेंट विसेंटचे पंतप्रधान राल्फ गोंसाल्वेज, अँटिग्वा आणि बारबुडाचे पंतप्रधान बाल्डविन स्पेन्सर, वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष ज्युलियन हंटे, मंडळाचे संचालक एल्सन क्रिक आणि मंडळाचे कायदेशीर सल्लागार एलाना मेडफेर्ड यांच्याशी चर्चा केली. 2011 च्या वर्ल्डकपनंतर प्रथमच गेल विंडीजच्या टीमकडून खेळणार आहे.
स्फोटक फलंदाज म्हणून सर्वत्र ख्याती असलेल्या गेलने नुकत्याच झालेल्या इंडियन प्रीमिअर लीगच्या पाचव्या सत्रात धावांचा पाऊस पाडताना सातशेपेक्षा अधिक धावा ठोकल्या होत्या.
वेस्ट इंडीज संघ :
डॅरेन सॅमी (कर्णधार), ख्रिस गेल, जोहान्सन चार्ल्स, एल. सिमन्स, डॅरेन ब्राव्हो, केरोन पोलार्ड, मार्लोन सॅम्युअल्स, डॅवेन ब्राव्हो, दिनेश रामदीन, डेवेन स्मिथ, आंद्रे रसेल, टीनो बेस्ट, फिडेल एडवर्ड्स, रवी रामपॉल, सुनील नारायण.