आईपीएलच्या यंदाच्या पर्वातील 40 व्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबच्या विरोधात रॉयल चँलेंजर्स बेंगळुरूच्या ख्रिस गेलने तुफानी खेळी करत शतक ठोकले. त्याचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या अशा मोठ्या खेळीची आतुरतेने वाट पाहत होते. गेलने 46 चेंडूंमध्ये शतक ठोकले. तर संपूर्ण खेली 57 चेंडूत 117 धावांची होती. आयपीएलच्या यंदाच्या पर्वातील हे आतापर्यंतचे सर्वात वेगवान शतक आहे. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 12 गगनचुंबी षटकार लगावले. यात यंदाच्या आयपीएलमधील सर्वात मोठ्या 108 मीटरच्या षटकाराचाही समावेश आहे.
बेंगळुरूच्या 226 धावा
गेलच्या तुफानी खेळीच्या जोरावर बेंगळुरूने 20 ओव्हर्समध्ये ३ विकेट गमावत 226 धावा केल्या. श्रीनाथ अरविंद (4 विकेट) आणि मिशेल स्टार्क (4 विकेट) यांच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर पंजाबचा संपूर्ण संघ 88 धावांवरच गारद झाला. गेलला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही देण्यात आला. गेलसाठी पहिली ओव्हर फारशी चांगली राहिली नाही. पण लगेच दुसऱ्या ओव्हरमध्ये फटकेबाजी करत त्याने 20 धावा वसूल केल्या. ती ओव्हर मिशेल जॉन्सन टाकत होता. टी 20 च्या इतिहासात जॉन्सनच्या विरोधात असे कधीही झाले नाही.
आयपीएल 8 चा सर्वात मोठा विजय
एवढेच नाही तर पंजाबला 138 धावांनी पराभूत करत बेंगळुरूने आयपीएल 8 मध्ये सर्वात मोठा विजय मिळवला. गेलने तुफानी खेळी सुरू केली आणि एकापाठोपाठ एक विक्रम रचत गेला.
पुढील स्लाइड्स जाणून घ्या गेलने या खेळीत केलेले रेकॉर्ड आणि त्याचा खास अंदाज...