आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेल लवकरच आक्रमक रूपात दिसेल : स्मिथ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ढाका - वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा सलामीवीर क्रिस गेल लवकर लयीत येईल आणि तो आपल्या नैसर्गिक आक्रमक स्वरूपात खेळताना मैदानावर चाहत्यांना दिसेल, असा विश्वास त्याचा सहकारी डेवेन स्मिथने व्यक्त केला. बांगलादेशविरुद्ध वर्ल्डकपच्या सामन्यात गेलने संथ फलंदाजी केली. भारताविरुद्ध सामन्यातही तो आपल्या नेहमीच्या रंगात दिसला नाही. बांगलादेशविरुद्ध मात्र त्याने 48 धावा काढल्या होत्या. मात्र, या धावा खूप संथ गतीने निघाल्या. ‘गेल लवकरच आपल्या लौकिकानुसार धावा काढेल, याचा मला विश्वास आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तो खेळपट्टीवर टिकून आहे. हे चांगले संकेत आहेत. वेगाने धावा काढण्याचा विचार केला तर तो ही कामगिरी लवकरच करेल,’ असे स्मिथने नमूद केले.

आमच्या टीमला चांगली सुरुवात करून देणे, हे माझे काम आहे. मला माझ्या भूमिकेसोबत न्याय द्यायचा आहे. गेलवर कसलाही दबाव नाही, हे मी सर्वांना स्पष्ट करू इच्छितो, असेही त्याने स्पष्ट केले.

स्मिथने बांगलादेशविरुद्ध 43 चेंडूंची खेळी करताना 10 चौकार, 3 षटकारांसह 72 धावा कुटल्या होत्या. गेल आणि स्मिथ यांनी बांगलादेशविरुद्ध 97 धावांची शानदार सलामी दिली होती.