(फोटोओळ - ख्रिस गेलने इंस्टाग्रावर पोस्ट केलेले छायाचित्र)
जमैका - वेस्ट इंडीजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल जेवढा मैदानावर चर्चेत असतो त्याहूनही तो मैदानाबाहेर जास्त चर्चेत असतो. गेल सध्या हिप्पी स्टाइल पार्टीच्या मुडमध्ये आहे. कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये भाग घेताना त्याने गर्लफ्रेंड बरोबर रेस्तरॉ 'ट्रिपल सेंचुरी'मध्ये दिलखूलास पार्टी केली. त्यामध्ये अन्य साथीदाराबरोबर मद्य आणि सिगार पिताना दिसला होता.
उल्लेखनिय म्हणजे व्यावसायिक क्रिकेटपटू किंवा अन्य खेळाडू सिगरेट किंवा सिगार घेत नाहीत. फिटनेससाठी खेळाडू सिगार टाळत असतात. परंतु इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या छायाचित्रामध्ये गेल सिगार ओढताना दिसत आहे.
चांगले राहिले प्रदर्शन
गेल कॅरिबियन प्रीमियर लीगमधील 'जमैका टालावाह' संघाचा कर्णधार आहे. त्याचे फलंदाजीतील प्रदर्शन उत्कृष्ट राहिले आहे. सात सामन्यांमध्ये त्याने 67.80 च्या सरासरीने 339 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, गेलच्या हिप्पी स्टाइल पार्टीची छायाचित्रे..