आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेलला जडला होता मोठा आजार, आई- वडिलांनाही कळू दिले नव्हते आजाराबाबत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ख्रिस गेलच्या सिक्स मशिन या आत्मचरित्र पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी दिल्लीत झाले. - Divya Marathi
ख्रिस गेलच्या सिक्स मशिन या आत्मचरित्र पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी दिल्लीत झाले.
स्पोर्ट्स डेस्क- वेस्ट इंडिजचा तूफानी बॅट्समन ख्रिस गेलने आपल्या आयुष्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे. त्याचे म्हणणे आहे की, त्याच्या हद्यात एक मोठे छिद्र होते. ज्याची माहिती त्याला 2005 मध्ये ऑस्ट्रेलिया दौ-यादरम्यान झाली. शुक्रवारी दिल्लीत गेलने आपले आत्मचरित्र 'सिक्स मशीन' लॉन्च केले. या इव्हेंटदरम्यान या कॅरेबियन बॅट्समनने हा खुलासा केला. या दरम्यान, बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकुर आणि माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग उपस्थित होता. काय झाले होते ऑपरेशननंतर...
- शुक्रवारी आपली आत्मकथा 'सिक्स मशीन' लॉन्च सोहळ्यादरम्यान गेल म्हणाला, 'ऑस्ट्रेलियातील ट्रीटमेंटदरम्यान मला माझ्या हद्यात एक छिद्र असल्याचे सांगण्यात आले. याबाबत मी कुणालाच माहिती दिली नाही. एवढेच नव्हे तर मी आई-वडिलांनाही सांगितले नाही.'
- गेलने सांगितले की, 'त्यासाठी मला तत्काळ सर्जरी करावी लागली. तसेच ऑपरेशननंतर मी आई-वडिलांना याबाबत माहिती दिली.'
- तो म्हणाला की, ' याच सर्जरीमुळे तो अॅडलेडमधील तिसरी आणि शेवटची कसोटी खेळू शकलो नव्हतो. यानंतर मला माझ्या आयुष्याचे महत्त्व कळून आले.'
- गेलच्या म्हणण्यानुसार, '2005 मध्ये झालेल्या त्या ऑपरेशननंतर मी खरे आयुष्य जगायला सुरुवात केली व एन्जॉय करू लागलो. तो माझ्या जीवनातील असा एक क्षण होता ज्यामुळे माझे संपूर्ण जीवनच बदलून गेले.'
'आता परिपक्व झालोय'-
- गेलने म्हणाला, मी पिता बनल्यानंतर एक व्यक्ती म्हणून अधिक परिपक्व झालोय.
- तो म्हणाला, 'निश्चितच एक कौटुंबिक व्यक्ती बनने माझ्यासाठी आव्हान आहे मात्र मला गर्व वाटतो की मी एका सुंदर मुलीचा बाप बनलोय. हा एक वेगळा अनुभव घेतोय.'
स्वत:ला संबोधले सिक्स मशीन-
- आपल्या खेळाबाबत गेल म्हणाला, मला कधीही संथ व्हायला आवडणार नाही. मला वाटते मी बेस्ट एंटरटेनर आहे व सिक्स मशीन आहे.'
- या बुक लॉन्चिंग इव्हेंटला बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकुर आणि टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग उपस्थित होते.
- बीसीसीआयचे अध्यक्ष ठाकूर म्हणाले, या पुस्तकाचे नावच गेलबाबत सर्व काही सांगत आहे. मला आशा आहे त्याच्या स्फोटक फलंदाजीप्रमाणेच त्याचे पुस्तकही अशीच स्फोटक माहिती देणारे असेल.'
- तर माजी भारतीय ओपनर सेहवाग म्हणाला, 'गेल आपल्या अग्रेसिव्ह स्टाईलमुळे क्रिकेट फॅन्सला सर्वात जास्त एंटरटेन करणारा क्रिकेटर आहे. क्रिकेटबाबतचा त्याचा दृष्टीकोन त्याच्या खेळातून साफ दिसतो. त्याच्या पुस्तकातूनही लोकांना अधिक माहिती मिळेल.'
- सेहवाग म्हणाला, 'मैदानात जेव्हा आम्ही बोलायचे तेव्हा षटकार मारण्याबाबतच चर्चा करणे पसंत करायचो. एखाद्या बॉलरची कशी धुलाई करायची खासकरून ऑस्ट्रेलियन बॉलर्सची यावर चर्चा व्हायची.'
पुढे स्लाईड्समध्ये पाहा, गेलच्या बुक लॉन्चिंग इव्हेंटच्या फोटोजसह तेथे गेलने कशी केली मस्ती...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...