आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chris Gayle Scored Hundred As West Indies Won Against By 6 Wickets

ख्रिस गेलचे तडाखेबाज शतक, वेस्‍ट इंडिजचा श्रीलंकेवर बोनस गुणासह विजय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जमैका- धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलच्‍या आक्रमक शतकाच्‍या जोरावर वेस्‍ट इंडिजने श्रीलंकेचा 6 विकेट्सने सहज पराभव केला. ख्रिस गेलने 100 चेंडुंमध्‍ये 109 धावांची स्‍फोटक खेळी केली. त्‍यामुळे श्रीलंकेच्‍या आव्‍हानातील हवाच निघून गेली.

वेस्‍ट इंडिजमध्‍ये सुरु झालेल्‍या तिरंगी मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी जमैका येथे झाला. वेस्‍ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्‍या फलंदाजांना मोठी धावसंख्‍या उभारता आली नाही. माहेला जयवर्धेने आणि उपुल थरंगा या जोडीने 65 धावांची दमदार सलामी दिली. त्‍यानंतर ठराविक अंतराने श्रीलंकेचे फलंदाज बाद होत गेले. एकाही फलंदाजाला स्थिरावल्‍यानंतर मोठी खेळी करता आली नाही. त्‍यामुळे श्रीलंकेचा संघ 48.3 षटकांमध्‍ये 208 धावांमध्‍ये गारद झाला. सुनील नारायणने 4 तर रवि रामपॉलने 3 बळी घेऊन दमदार कामगिरी केली. माहेला जयवर्धेनेने 52 तर कर्णधार एंजेलो मॅथ्‍युजने नाबाद 55 धावांची खेळी केली.