आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chris GayleNews In Marathi, Cricket, West Indies, Divya Marathi

क्रिस गेलचे विंडीजच्या टी-20 संघात पुनरागमन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अँटीग्वा - वेस्ट इंडीजचा आक्रमक सलामीवीर क्रिस गेलने टी-20 संघात पुनरागमन केले आहे. गत एक महिन्यापासून तो पाठीला झालेल्या दुखापतीमुळे संघाबाहेर होता. इंग्लंडविरुद्ध होणा-या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत तो खेळेल.
गेल्या महिन्यात आयर्लंडविरुद्ध खेळताना गेलला दुखापत झाली होती. त्यामुळे नुकत्यात झालेल्या तीन दिवसांच्या एकदिवसीय मालिकेलाही तो मुकला.

ही मालिका कॅरेबियनांनी 2-1 ने गमावली.बांगलादेशात होणा-या टी-20 विश्वचषकाच्या तोंडावर कॅरेबियनांचा जीव भांड्यात पडला आहे. संघ असा : डॅरेन सॅमी (कर्णधार), सॅम्युअल्स बद्री, ड्वेन ब्रॉव्हो, जॉन्सन चार्ल्स, आंद्रे फ्लेचर, क्रिस गेल, सुनील नरेन, दिनेश रामदीन, रवी रामपाल, आंद्रे रसेल, मार्लोन सॅम्युअल्स, कृष्मर संतोकी, लिंडल सिमन्स आणि ड्वेन स्मिथ.