आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Chris Gayle's Blitzkrieg Propels Dhaka To BPL Final

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गेलचे शतक; ढाका ग्लेडिएटर्स फायनलमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मीरपूर- स्फोटक ओपनर ख्रिस गेल वेस्ट इंडीजकडून चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे. मात्र, त्याने बांगलादेश क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये 12 षटकारांसह 114 धावा काढल्या. त्याच्या धुवाधार फलंदाजीच्या बळावर ढाका ग्लेडिएटर्सने फायनलमध्ये प्रवेश केला.

गेलने अवघ्या 51 चेंडूत पाच चौकार व 12 षटकार ठोकून 114 धावांची खेळी केली. यामुळे ग्लेडिएटर्सला 20 षटकांत 9 गडी गमावून 197 धावा काढता आल्या. प्रत्युत्तरात सिलहट रॉयल्सला केवळ 193 धावांपर्यंत मजल मारता आली. रॉयल्सकडून कर्णधार रहीमने 86 धावा काढल्या. मात्र, त्याला टीमचा पराभव टाळता आला नाही.