आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Chris Kerns News In Marathi, New Zealand, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू ख्रिस केर्न्स झाला सफाई कामगार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - खेळ कुणाला दैवाचा कळला... याचाच प्रत्यय न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू ख्रिस केर्न्सवर ओढवलेल्या सध्याच्या परिस्थितीकडे पाहिल्यास प्रकर्षाने येतो. एकेकाळी क्रिकेटचे मैदान गाजवणा-या न्यूझीलंडच्या या महान खेळाडूवर आजघडीस ऑकलंड येथे बसची स्वच्छता करण्याची वेळ आली आहे.

ख्रिस केर्न्स सध्या ऑकलंडच्या सिटी कौन्सिलमध्ये नोकरी करत आहे. या ठिकाणी तो पाण्याची वाहतूक करणा-या ट्रकवर चालक म्हणूनही काम करतो. तसेच ट्रॅकमधून आणलेल्या पाण्याने डेपोतील बसची सफाई करण्याचेही काम त्यालाच करावे लागते.

फिक्सिंगचा डंख
* मॅच फिक्सिंगप्रकरणी सुरू न्यायालयीन लढाईत केर्न्सला क्रिकेटमधून कमावलेली आपली कोट्यवधींची संपत्ती गमवावी लागली आहे.
* फिक्सिंग प्रकरणात निर्दोष आहोत. हे लवकरच जगजाहीर होईल. त्यासाठी मला न्यायालयीन लढाई लढावी लागत आहे, असे केर्न्स म्हणाला.

एका तासाला १७ डॉलर
सफाई कामगार म्हणून
केलेल्या कामाबद्दल ख्रिस केर्न्सला एका तासासाठी १७ डॉलर मिळतात. त्याच्या कुटुंबात पत्नी आणि चार अपत्ये आहेत.

रावाचा झाला रंक
* एकेकाळी दुबईत
अभिनेत्याचे काम केलेल्या ख्रिस केर्न्सने आपली तिसरी पत्नी मेल क्रासरला प्रपोज करण्यासाठी ३.२ कॅरेटचा हिरा भेट दिला होता.
* मात्र, आज संध्याकाळच्या जेवणाचीही त्याला भ्रांत आहे. सफाई कामगाराशिवाय त्याच्यासमोर कुठलाच पर्याय उपलब्ध नसल्याचे त्याच्या ३४ वर्षीय पत्नी क्रासरने सांगितले.