आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिस्टियानो रोनाल्डोचा गोलने माद्रिदची एल्सीवर मात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माद्रिद - सामन्याच्या निर्धारित वेळेनंतरच्या ‘एंज्युरी टाइम’मध्ये पंचांनी दिलेल्या शंकास्पद पेनॉटीचा फायदा घेत क्रिस्टियानो रोनाल्डोने केलेल्या गोलच्या बळावर रिअल माद्रिदने एल्सी संघावर 2 -1 ने मात केली. त्यामुळे माद्रिद संघाने गुणतालिकेतील अग्रस्थानाच्या दिशेने झेप घेतली.


अखेरच्या क्षणी मिळालेल्या संधीचा फायदा घेत रोनाल्डोने केलेला गोलच माद्रिदसाठी निर्णायक ठरला. मात्र माद्रिदचे प्रशिक्षक कार्लो अ‍ॅनसेलोटी यांनी आपण संघाच्या कामगिरीवर समाधानी नसल्याचे सांगितले. ज्या पद्धतीने आमच्या संघातील खेळाडूंनी उत्तरार्धात खेळ केला, तसा खेळ आम्हाला अपेक्षित नव्हता. एल्सी संघाने अत्यंत चांगला खेळ केला असून खरेतर हा सामना बरोबरीत सुटणे अधिक योग्य ठरले असते, असेही त्यांनी सांगितले.


माद्रिदच्या गोलरक्षकाने वाचवले सहा हल्ले : रोनाल्डोने उत्तरार्धात एक गोल केल्यानंतर एल्सीच्या खेळाडूंनी आक्रमकपणे हल्ले करण्यास प्रारंभ केला. मात्र माद्रिदच्या गोलपोस्टवरील हे हल्ले गोलरक्षक दिएगो लोपेझ याने परतवून लावले.


अतिरिक्त वेळेत गोल
दोन्ही संघ 1 - 1 असे बरोबरीत असताना पंचांनी दुखापतीसाठीचा वाढीव वेळ म्हणून तीन मिनिटांचा कालावधी वाढवून दिला. त्याच वेळी माद्रिदचा पेपे जमिनीवर कोसळल्याने पंचांनी माद्रिदला पेनॉल्टी किक दिली. त्याचा निषेध करण्यासाठी एल्सीचे बहुतांश खेळाडू पंचांकडे धावले. त्याच वेळी रोनाल्डोने त्या संधीचा फायदा घेत विजयी गोल केला.