आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cincinati Mosters Tennis News In Marathi, Divya Marathi, Serena Williams

सिनसिनाटी मास्टर्स: सेरेना विल्यम्स, रॉजर फेडररने फोडली किताबाची दहीहंडी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनसिनाटी - जगातील नंबर वन सेरेना विल्यम्स आणि रॉजर फेडररने सोमवारी सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेत किताबाची दहीहंडी फोडली. सेरेनाने महिला एकेरीच्या विजेतेपदावर नाव कोरले. तिने अंतिम सामन्यात अ‍ॅनाला पराभूत केले. तसेच रॉजर फेडरर पुरुष एकेरीत अजिंक्यपदाचा मानकरी ठरला. स्विसच्या खेळाडूने फायनलमध्ये फेररवर मात केली.
पाच वेळच्या ग्रँडस्लॅम चॅम्पियन मारिया शारापोवाला धूळ चारणा-या सर्बियाच्या अ‍ॅना इवानोविकला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे स्पेनचा डेव्हिड फेरर पुरुष एकेरीत उपविजेता ठरला.

सेरेना 62 मिनिटांत विजयी
अव्वल मानांकित सेरेना विल्यम्सने आक्रमक सर्व्हिस करून अवघ्या 62 मिनिटांत अंतिम सामना जिंकला. तिने सरळ दोन सेटमध्ये सर्बियाच्या अ‍ॅना इवानोविकला धूळ चारली. अमेरिकेच्या सेरेनाने 6-4, 6-1 अशा फरकाने अंतिम सामना जिंकला. याशिवाय तिने आठवडाभरात सलग दुस-या अजिंक्यपदावर नाव कोरले. दमदार सुरुवात करताना पहिल्या सेटमध्ये बाजी मारली. दरम्यान, अ‍ॅनाने प्रत्युत्तराचा प्रयत्न केला. मात्र, तिचा सेरेनासमोर फार काळ निभाव लागला नाही. शारापोवाविरुद्धच्या उपांत्य लढतीतील विजयाने अ‍ॅनाचा आत्मविश्वास द्विगुणित झाला. मात्र, तिला ही विजय लय सेरेनाविरुद्ध लढतीत कायम ठेवता आली नाही. त्यामुळेच तिचे यंदाच्या सत्रात विजेतेपद पटकावण्याचे स्वप्नही भंगले.

डेव्हिडची झुंज अपयशी
पाचव्या मानांकित डेव्हिड फेररने अंतिम सामन्यात विजयासाठी शर्थीची झुंज दिली. मात्र, त्याने केलेला प्रयत्न थिटा पडला. त्याचे सत्रातील दुसरे आणि करिअरमधील 22 वे अजिंक्यपद जिंकण्याचे स्वप्नही पाण्यात गेले.

फेडररचे 80 वे अजिंक्यपद
स्विस किंग रॉजर फेडररने सोमवारी टेनिस करिअरमधील 80 वे विजेतेपद आपल्या नावे केले. त्याने अंतिम सामन्यात डेव्हिड फेररला 6-3, 1-6, 6-2 अशा फरकाने विजय मिळवला. याशिवाय त्याने सहाव्यांदा या स्पर्धेचा किताब जिंकला. तसेच फेररविरुद्धची आपली विजयी मोहीमही अबाधित ठेवली. आतापर्यंत फेडररने 17 व्यांदा डेव्हिड फेररचा पराभव केला.