आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिनसिनाटी टेनिस स्पर्धा : रॉजर फेडररची आघाडी; मुरेचा दारुण पराभव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिनसिनाटी- जगातील नंबर एक टेनिसपटू रॉजर फेडरर व दुसरा मानांकित नोवाक जोकोविचने शुक्रवारी सिनसिनाटी ओपन टेनिस स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. अंतिम आठमध्ये स्थान मिळालेल्या फेडररची लढत आता अमेरिकेच्या मार्डी फिशसोबत होणार आहे. दुसरीकडे जोकोविचला ऑस्ट्रेलियाच्या बर्नाड टॉमिचला दुसर्‍या फेरीत अव्वल मानांकित रॉजर फेडररच्या आव्हानाचा सामना करावा लागला. या वेळी त्याने प्रत्युत्तराचा जोरदार प्रयत्न केला.मात्र, फेडररने त्याचा हा प्रयत्न उधळून लावला. फेडररने पहिला सेट 6-2 ने जिंकून आघाडी मिळवली. विजयाचा हाच सिलसिला कायम ठेवत फेडररने दुसरा सेटही 6-4 ने आपल्या नावे केला.
सर्बियाचा अव्वल मानांकित टेनिसपटू नोवाक जोकोविचला शुक्रवारी दुसर्‍या फेरीत सहज विजय मिळाला. रशियाचा निकोले डेविडेकोने दुखापतीमुळे सामना अध्र्यावर सोडण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, जोकोविचने पहिला सेट 6-0 ने जिंकला होता. ऐनवेळी निकोलेने माघार घेतल्यामुळे पंचांनी जोकोविचला विजयी घोषित केले.
ऑलिम्पिक चॅम्यिपन मुरेचा पराभव- लंडन ऑलिम्पिक चॅम्पियन अँडी मुरेला पराभवाचा अनपेक्षित धक्का सहन करावा लागला. पुरुष एकेरीच्या दुसर्‍या फेरीत त्याला फ्रान्सच्या जेरेमी चार्डीने धूळ चारली. चार्डीने ही लढत 6-4, 6-4 अशा फरकाने जिंकून धक्कादायक निकालाची नोंद केली. पहिला सेट गमावणार्‍या इंग्लंडचा टेनिसपटू मुरेने प्रत्युत्तराचा प्रयत्न केला.मात्र, चार्डीच्या आक्रमक खेळीसमोर त्याचा फार काळ निभाव लागला नाही. यामुळे त्याला पराभवाला सामोरे जावे लागले.
पेस-स्टेपानेकचा पराभव- भारताचा लिएंडर पेस व चेक गणराज्यचा रादेक स्टेपानेक या पाचव्या मानांकित जोडीला पराभवाचा सामना करावा लागला. पुरुष दुहेरीच्या लढतीत या जोडीला क्रोएशियाच्या इवान डोडिंग व मार्सेलो मेलोने 6-3, 4-6, 10-5 अशा फरकाने पराभूत केले. पेस-स्टेपानेकला पहिल्या फेरीत पुढे चाल (बाय) मिळाली होती. दुसर्‍या सेटमध्ये पुनरागमन करून बरोबरी साधणार्‍या पेस-स्टेपानेकला तिसर्‍या निर्णायक सेटमध्ये यश मिळवता आले नाही.