आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेव्ह विश्व अजिंक्यपद कबड्डी लीग: सर्कल कबड्डी लीगचे सामने यंदा भारतात होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वेव्ह विश्व अजिंक्यपद कबड्डी लीगच्या पहिल्या वर्षाच्या यशानंतर यंदा त्यात आणखी दोन संघ वाढवून अधिकांश सामने भारतात खेळवण्याची योजना वर्ल्ड कबड्डीचे सीईओ रमण रहेजा यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितली.

रहेजा म्हणाले, ‘टॅम इंडियाच्या अहवालानुसार वर्ल्ड कबड्डी लीग १०० कोटींपेक्षा अधिक लोकांपर्यंत पोहोचली. पहिल्याच वर्षी या लीगने जगातील ‘टॉप फाइव्ह प्रॉपर्टीज’मध्ये स्थान मिळवावे हे आमच्यासाठी भूषणावह आहे. मात्र, यंदा ही लीग फक्त अमेरिका, कॅनडा आणि भारतातच होणार आहे. अधिकांश सामने भारतातच होतील, कारण भारतीय कबड्डी रसिकांनी या लीगला प्रचंड प्रतिसाद दिला. अन्य देशांमध्ये सामने आयोजित केल्यामुळे सोईस्कर भारतीय वेळेनुसार लीगचे टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपण करता आले नाही. ‘टाइम झोन’मधील फरकाचा फटका या लीगला बसल्याचे रहेजा म्हणाले. भारतात अधिक सामने होतील. ८ संघांमध्ये दोन संघांची भर पडेल. म्हणजे १० संघांची लीग या वेळी होईल. कोर्ट मोठे लागत असल्याने इनडोअरमध्ये लीग आयोजित करणे कठीण जाते.

-मीडियामध्ये लीगचे मूल्यांकन ३०० कोटींवर झाले तर प्रत्येक सामना साडेतीन कोटींचा ठरला. ‘वेव्ह’ने स्पर्धेवर १३५ कोटी, तर प्रत्येक सामन्यावर दीड कोटी रुपये खर्च केले होते. त्यापैकी बहुतांश वाटा खर्चाचा व खेळाडूंना देण्यात आलेल्या मानधनाचाही होता.
-प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्थाही चांगली लागते. अशा स्टेडियम्सवर लीग आयोजित करणार आहोत. मुंबईतील अंधेरी येथील शहाजीराजे क्रीडा संकुल सध्या आयाेजकांच्या विचारात आहे.
लीगची खास वैशिष्ट्ये
-‘टॅम इंडिया’ या मार्केट रिसर्च कंपनीने दिलेल्या अहवालानुसार, सोनी सिक्सवर थेट प्रक्षेपण असणा-या या कबड्डी लीगचे सामने यूट्यूबवर दीड कोटी लोकांनी पाहिले. ८६ सामन्यांचे १४३ तास टेलिव्हिजनवर प्रक्षेपण झाले. प्रत्येक सामना ४० मिनिटे थेट दाखवला गेला.
-टायटल स्पॉन्सर्स ‘वेव्ह’ला ४५ टक्के प्रेक्षकांची पसंती मिळाली. आयपीएल आणि आयएसएलनंतर कबड्डी लीगला प्रेक्षकांची पसंती लाभली.