आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Clinical Holland Fire Euros Warning By Thrashing Northern Ireland‎

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॉलंडचा आयर्लंडवर 6-0 ने एकतर्फी विजय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अँमस्टरडॅम - यंदाच्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणार्‍या हॉलंडने मैत्रीपूर्ण सामन्यात उत्तर आयर्लंडवर 6-0 अशा एकतर्फी विजय मिळवला. 2010 च्या विश्वचषकातील उपविजेत्या हॉलंडने पहिल्या हाफमध्ये 4 गोल करून विजयाचे संकेत दिले होते. या संघाच्या आक्रमक खेळीपुढे दमछाक झालेल्या आयर्लंडला एकही गोल करता आला नाही. या धडाकेबाज विजयाने फॉर्मात आलेल्या हॉलंडने विजेतेपदासाठीचा दावा मजबूत केला आहे. युरो चषकात हॉलंडचा सामना शनिवारी डेन्मार्कसोबत रंगणार आहे.
इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक गोल करणार्‍या रॉब वेन पर्सी याने हॉलंडकडून गोलचे खाते उघडले. त्याने तिसर्‍या मिनिटाला गोल करून संघाला 1-0 ने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर श्वाइडरने शानदार किक मारून दुसरा गोल नोंदवला. त्यापाठोपाठ पर्सीने पुन्हा आपल्या आक्रमक खेळीचे प्रदर्शन करत संघाला तिसरा गोल करून दिला. दरम्यान, एफलेने गोल करून आघाडीचे आव्हान 4-0 ने मजबुत केले. दुसर्‍या हाफमध्येही उत्तर आयर्लंडला एकही गोल करता आला नाही. वेगवान व चपळ खेळीमुळे दमछाक झालेल्या आर्यलंडला वेन डर वार्टने शेवटचा जबर धक्का दिला. त्याने हॉलंडकडून महत्त्वपूर्ण दोन गोल केले. या गोलच्या बळावर हॉलंडने 6-0 ने आघाडी घेतली. शेवटच्या मिनिटापर्यंत गोलच्या प्रयत्नात असलेल्या आयर्लंडला अपयश आले.