(फोटो - रुध्दीमान साहा शॉट खेळताना)
मोहाली - अनुरीत सिंह आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 3 विकेट आणि फलंदाजीतील दमदार प्रदर्शनाच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने केप कोब्रा संघाला 7 विकेटने पराभूत केले. पंजाब संघाने केप कोब्रा संघाला 18.3 षटकातच ऑलआऊट केले होते. त्यानंतर 18.1 षटकातच तीन खेळाडूंच्या मोबदल्यात 139 धावा करुन विजय मिळविला.
चांगली सुरुवात
135 धावांचा पाठलाग करताना पंजाब संघाने चांगली सुरुवात केली. 5.3 षटकातच मनन वोहरा आणि वीरेंद्र सेहवाग यांनी 41 धावांची भागीदार केली. सेहवाग आणि मनन वोहरा यांनी 23-23 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने 23 धावा केल्या. वृध्दीमान साहा 42 आणि डेव्हीड मिलर 16 धावा करुन नाबाद राहिला. केप कोब्राकडून रॉबिन पीटरसनने दोन विकेट मिळविल्या.
गोलंदाजांची कमाल
पंजाबने
आपल्या घरच्या मैदानावर अप्रतीम खेळीचे पद्रर्शन केले. अक्षर पटेल आणि अनुरीत सिंह यांनी अ्रप्रतिम गोलंदाजीचा प्रत्यय दिला. दोघांनीही प्रत्येकी तीन विकेट मिळविल्या. अक्षर पटेलने चार षटकात 16 धावा देत तीन विकेट मिळविल्या. अनुरीतने 2.3 षटकांमध्ये 12 धावा देत तीन गड्यांना तंबूचा रस्ता दाखविला. परविंदर अवाना, थिसारा परेरा, कर्णवीर सिंह आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी एक विकेट मिळविली.
पुढील स्लाइडवर पाहा, सामन्यादरम्यानची रोमांचक छायाचित्रे...