आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकच फाइट...वातावरण टाइट...! नेमबाज श्रेयसीने जिंकले रौप्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्लास्गो - भारताने 20 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रविवारी रौप्यपदकापासून सुुरुवात केली. श्रेयसी सिंगने महिलांच्या डबल ट्रॅप नेमबाजीत शानदार कामगिरी करताना रौप्यपदक जिंकले. यानतंर जवळपास दोन तासांच्या अंतराने पुरुषांच्या डबल ट्रॅप प्रकारात भारताच्या मोहंमद असबने कांस्यपदक जिंकून दमदार प्रदर्शन केले. त्याने पुरुषांच्या डबल ट्रॅपमध्ये हे यश मिळवले. हॉकीत भारताला न्यूझीलँडकडून 3-0 ने पराभवाचा सामना करावा लागला. ग्लासगो गेम्समध्ये नेमबाजीत भारताने सर्वाधिक 10 पदके जिंकली. यात 3 सुवर्ण, 6 रौप्य आणि एक कांस्यपदक आहे.
महिलांच्या डबल ट्रॅपचे सुवर्ण आणि कांस्यपदक इंग्लंडच्या नेमबाजांनी जिंकले. चार्लोट केरवूडने 94 आणि रेचल पारिशने 91 गुणांसह कांस्यपदक मिळवले. तिने बॅरी बडन शूटिंग रेंजवर पहिल्या सिरीजमध्ये 22 आणि दुसर्‍यामध्ये 24 तर तिसर्‍या व चौथ्या सिरीजमध्ये प्रत्येकी 23 गुण मिळवले. केरवूडने आपली सुरुवात 26 गुणांपासून केली. नंतर पुढच्या सिरीजमध्ये तिने 25, 24, 19 असे गुण मिळवले. भारताची भारताची वर्षा वर्मन 88 गुणांसह पाचव्या स्थानी राहिली. तिने 22, 19, 24 आणि 23 गुण मिळवले.
मनोजचे यश
बॉक्सिंगमध्ये भारताचा युवा खेळाडू मनोजकुमारने पुरुषांच्या लाइट हेवी 81 किलो प्रकारात कॅनडाच्या बियारस्लोनोव्हला 2-1 ने हरवले. मनोजने या विजयासह उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. मनोजने 29-28, 29-28, 28-29 असा अवघ्या एका गुणाने विजय मिळवला. आता मनोजच उपांत्यपूर्व सामना मंगळवारी स्कॉटलंडच्या मॅक्सवेलसोबत होईल.
एकच फाइट... वातावरण टाइट...!
बॉक्सिंगमध्ये रविवारी पुरुषांच्या लाइट वेल्टरवेट प्रकारात केनियाचा डेनिस ओथने इंग्लंडच्या सॅम्युअल्स मॅक्सवेलला इतका जोरदार पंच मारला की त्याच्या चेहर्‍याचा ‘भुगोल’च बदलला.
युवा वेटलिफ्टर पूनम यादवलाही पदक
भारताची युवा वेटलिफ्टर पूनम यादवने महिलांच्या 63 किलो गटात कांस्यपदक पटकावले. वाराणसीच्या या 19 वर्षी खेळाडूने 202 किलो वजन उचलत ही कामगिरी साधली. गटात नायजेरियाच्या ओ. अडेसानमीने 207 किलो वजन उचलत सुवर्ण, तर नायजेरियाच्याच ओबिओमा ओकोलीने 207 किलो वजन पेलत रौप्यपदक जिंकले.
श्रद्धा, ओमप्रकाशचे अपयश
अ‍ॅथलेटिक्समध्ये एम. श्रद्धाला 100 मी. शर्यतीत सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यात अपयश आले. तिने 11.8 सेकंदासह हीटमध्ये पाचवे स्थान मिळवले. गोळाफेकीत ओमप्रकाश करहाना अपयशी ठरला.

पुढील स्लाइडमध्ये, श्रेयसीचे प्रत्युत्तर