आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Coach Duncan Fletcher May Quit After England Tour

इंग्लंड दौ-यानंतर पडणार फ्लेचर यांची वीकेट, BCCI ने दिले संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - इंग्‍लंडमध्‍ये सराव सत्रादरम्‍यान फ्लेचर)
नवी दिल्‍ली - भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर इंग्‍लंड दौ-यानंतर राजीनामा देऊ शकतात. असे बीसीसीआयच्‍या एका अधिका-याने सांगितले. कसोटी मालिकेतील मानहानीकारक पराभवानंतर बीसीसीआयने भारताच्या संघ व्यवस्थापन आणि सपोर्ट स्टाफमध्ये आमूलाग्र बदल करण्याचे पाऊल उचलले आहे.

बीसीसीआयच्‍या एका अधिका-याने सांगितले आहे की, ''डंकन यांच्‍याकडे आता कोणतेच अधिकार नाहीत. संघावर सर्व नियंत्रण रवी शास्‍त्रीचे राहणार आहे. फ्लेचर यांनी राजीनामा दिल्‍यास बासीसीआय त्‍याना मना करणार नाही. बोर्डाने संघ व्‍यवस्‍थापनात बदल करुन फ्लेचर यांना निवृत्‍तीचे जणूकाही संकेत दिले आहेत.''
शास्‍त्री ठरवणार रणनीती
कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि रवी शास्‍त्री दोघे मिळून संघाची आगामी रणनीती ठरविणार आहेत. याशिवाय संजय बांगड आणि भारत अरुन खेळाडूंना प्रशिक्षण देणार आहेत.
विदेशी मैदानावर अत्‍यंत खराब कामगिरी झाल्‍यानंतरसुदा बीसीसीआयने एप्रिलमध्‍ये फ्लेचर यांचा करार वाढविला होता. 2015 च्‍या विश्‍वचषकाच्‍या समाप्‍तीपर्यंत त्‍यांचा करार आहे. परंतु फ्लेचर करार मोडून राजीनामा देऊ शकतात. यामध्‍ये कोणतीच अडचण नाही.

फ्लेचरची कामगिरी
65 वर्षीय फ्लेचर यांनी 27 एप्रिल 2011 मध्‍ये भारतीय संघाच्‍या मुख्‍य प्रशिक्षकपदी नियुक्‍ती करण्‍यात आली होती. भारताचे माजी प्रशिक्षक गॅरी कस्‍टर्नच्‍या शिफारशीमुळे त्‍यांची नियुक्‍ती करण्‍यात आली होती.

फ्लेचरच्‍या कार्यकाळात विदेशामध्‍ये भारतीय संघाचे कसोटी प्रदर्शन
सामने - 20
विजय - 2
पराभव - 13
ड्रा - 5
यावेळी भारतीय संघ 6 वर्षांनंतर कसोटीमध्‍ये 100 धावसंख्‍येपेक्षा कमी धावसंख्‍येवर सर्वबाद झाले.
सर्वसाधारण कसोटी प्रदर्शन
सामने - 35
विजय - 13
पराभव - 15
ड्रा - 7
एकदिवसीय प्रदर्शन (विदेशामध्‍ये)
सामने - 56
विजय - 29
पराभव - 21
टाय - 3
एकदिवसीय सामन्‍यामध्‍ये संघाचे प्रदर्शन बरे राहिले.
सर्वसाधारण एकदिवसीय प्रदर्शन
सामने - 83
विजय - 47
पराभव - 29
टाई - 3
अनिर्णित - 4
दिग्‍गजांचे मत-
अजित वाडेकर, माजी कर्णधार-
''फ्लेचर यांनी आपणहून पदावरून दूर होण्याची वेळ आली आहे. धोनीने फलंदाजीच्या शैलीत सुधारणा केली, मात्र त्याने नेतृत्वशैलीत योग्य तो बदल केला नाही. संघातील अंतिम ११ खेळाडूंची निवड, क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना याबाबत त्याने अक्षम्य चुका केल्या आहेत.''
कृष्णम्माचारी श्रीकांत, निवड समितीचे माजी अध्यक्ष-
''फ्लेचर यांनी भारतीय संघासाठी काहीही केलेले नाही. संघातील अंतिम ११ खेळाडूंची निवड त्यांनी योग्य रितीने केलेली नाही. रविचंद्रन अश्विनला योग्य संधी दिली नाही. ''
पुढील स्‍लाइडवर वाचा, दक्षिण आफ्रिकेच्‍या प्रशिक्षकांविषयी