आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Colombia Qualify For World Cup With Thrilling Draw

कोलंबियाने मिळवले विश्वचषकाचे तिकीट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माँटेव्हिडिओ - चिलीविरुद्ध पूर्वार्धात 3 गोलने पिछाडीवर पडलेल्या कोलंबियाने उत्तरार्धात जोरदार मुसंडी मारत 3- 3 ने बरोबरी करीत 2014 च्या विश्वचषकातील सहभाग निश्चित केला आहे.
पूर्वार्धात चिलीने केलेल्या सातत्यपूर्ण हल्ल्यांना यश मिळत गेले. त्यात चिलीचा स्ट्रायकर अ‍ॅलेक्सिस सॅँचेझने दोन गोल लगावत आघाडी मिळविण्यात मोलाची भूमिका बजावली. मात्र, उत्तरार्धात चिलीचा कार्लोस कॅरमोनाला 66 व्या मिनिटाला लाल कार्ड दाखवत बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर चिलीच्या हातातून सामना निसटला. जेम्स रॉड्रिग्ज याने एक आणि फाल्काओ याने दोन गोल करीत कोलंबियाला बरोबरीत आणून ठेवले. त्यामुळे 1998 च्या विश्वचषकानंतर प्रथमच कोलंबियाचे विश्वचषकातील स्थान निश्चित झाले आहे.


चिलीचे भवितव्य आता टांगणीला
लढतीत विजय हुकल्याने चिलीला आता इक्वेडोरशी होणार्‍या सामन्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. या लढतीत चिलीला गुण मिळवणे अत्यावश्यक आहे. तरच टीमला विश्वचषकात सहभागाची संधी मिळू शकते. त्यामुळे हा सामना चिलीने बरोबरीत ठेवला तरी द. अमेरिकेचे प्रतिनिधित्व करू शकणार आहेत.