आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : गुडबाय ग्लासगो...आता गोल्ड कोस्टात भेटूया..!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्लासगो - रंगारंग कार्यक्रम आणि डोळ्यांचे पारणे फेडणार्‍या आतषबाजीने ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा समारोप सोहळा रंगला. समारोपाच्या कार्यक्रमाने उपस्थित चाहत्यांची मने जिंकली. गुडबाय ग्लासगो...आता गोल्ड कोस्टात भेटूया...असा नारा देत खेळाडूंनी स्पर्धेला निरोप दिला. पुढची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टा शहरात होणार आहे.

भारताची 64 पदके : या वेळी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने एकूण 64 पदके जिंकली. यात 15 सुवर्णपदकांचा समावेश आहे. भारताने 30 रौप्य आणि 19 कांस्यपदके जिंकली. 2010 च्या दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेच्या तुलनेत या वेळी आपली कामगिरी निराशाजनक ठरली. दिल्लीत भारताने 101 पदके जिंकताना गुणतालिकेत दुसर्‍या स्थानी धडक दिली होती. मात्र, या वेळी दिल्लीच्या तुलनेत भारताच्या पदरी तब्बल 35 पदके कमी आली. शिवाय पदकतालिकेतही भारताची घसरण झाली. या वेळी भारताने नेमबाजीत एकूण 17 पदके जिंकली आहेत. यात चार सुवर्णपदकांचा समावेश आहे.

समारोपाच्या कार्यक्रमप्रसंगी महिला खेळाडू सीमा पुनिया भारतीय गटाची ध्वजवाहक होती. सीमा पुनियाने भारतासाठी थाळीफेकीत रौप्यपदक जिंकले होते. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी नेमबाज विजयकुमार भारताचा ध्वजवाहक होता.

78 पैकी 29 महिलांना पदके
याउलट, 134 पुरुष खेळाडूंनी 35 पदके जिंकली. यात हॉकीचा समावेश नाही. दुसरीकडे, महिला हॉकीत मात्र पाचव्या स्थानी राहिलो.

दिल्लीपेक्षा सरस कामगिरी
2010 दिल्ली राष्ट्रकुलमध्ये भारताने 38 सुवर्णांसह 101 पदके जिंकली होती. यावेळी 15 सुवर्णांसह 64 पदके जिंकली. तरीही यशस्वी ठरलो, कारण...दिल्लीत 600 खेळाडू होते. यशाची सरासरी 16.88 होती. म्हणजेच प्रत्येक पाचव्या खेळाडूला पदक मिळाले. 2014 ग्लासगोत 215 खेळाडूंत 64 पदके. यशाची सरासरी 30.10 टक्के राहिली. म्हणजेच दर तिसर्‍या खेळाडूला पदक.

भारताचे नवे स्टार
सुवर्णपदक : जोश्ना चिनप्पा आणि दीपिका पल्लिकल (स्क्वॅश), बबिता (कुस्ती), सुखन डे, सतीश शिवालिंगम आणि संजिता खुमुकचम (भारोत्तोलन).
रौप्य : अयोनिका पॉल, मलायका गोयल (नेमबाजी), बजरंग (कुस्ती), देवेंद्रो, मनदीप जांगडा (बॉक्सिंग)

(फोटो : लव्ह एट फस्ट साइटवर परफॉर्म करताना पॉप स्टार कायली मिनॉन्ग)
पुढील स्लाइड्सवर पाहा ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या समारोप सोहळ्याचे खास फोटो...