आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Commonwealth Games 2014 Closing Ceremony, Latest News In Marathi

CWG: पॉप स्‍टार काइली मिनॉंगच्‍या गाण्‍याने राष्‍ट्रकुल स्‍पर्धेची सांगता,पुढील भेट गोल्ड कोस्टा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोओळ - लव एट फस्ट साइटवर परफॉर्म करताना काइली मिनॉंग)
ग्‍लासगो - 11 दिवस चाललेल्‍या 20 व्‍या राष्‍ट्रकुल स्‍पर्धांचा शानदान समारोप झाला. पॉप स्‍टार माइली मिनॉंगने लव एट फस्ट साइट या गाण्‍याने स्‍पर्धेची सांगता केली. तर यानंतरची राष्‍ट्रकुल स्‍पर्धा ऑस्‍ट्रेलियातील गोल्‍ड कोस्‍टमध्‍ये होणार आहेत. ग्‍लासगो येथे झालेल्‍या राष्‍ट्रकुल स्‍पर्धेत 71 देशांनी सहभाग नोंदवला. तब्‍बल 28 वर्षानंतर इंग्‍लडने सर्वांधीक पदके पटाविली.
सात वर्षांच्‍या तयारीचे फळ
यजमान स्‍कॉटलँडच्‍या अलेक्‍स सालमंड यांनी सांगितले की, '' या खेळांच्‍या यशस्‍वी आयोजनाची आम्‍हाला पुर्वीपासूनच आस्‍था लागली होती. आणि आम्‍हाला आता विश्‍वास आला की, आम्‍हीही मोठ्या खेळांचे यशस्‍वी आयोजन करु शकतो.''

काइली मिनॉंगचा जलवा
समारोप समारंभात प्रसिध्‍द पॉपस्‍टार काइली मिनॉंगचा जलवा राहिला आहे. आपल्‍या उत्‍कृष्‍ट गाण्‍यांचे सादरीकरण करत तिने गागर पार्कमध्‍ये उपस्थित हजारो प्रेक्षकांना आपल्‍या तालावर थिरकण्‍यास भाग पाडले. लव एट फर्स्ट साइट, ऑल द लवर्स, लोकोमोशन, ब्यूटिफुल आणि कॉन्ट गेट यू आउट ऑफ माय लाइफ या गाण्‍यांचे बहारदार सादरीकरण्‍ा केले.

भारत पाचव्‍या स्‍थानी
भारताने अंतीम दिनी कश्‍यपने एतिहासिक कामगिरी करत 32 वर्षांमध्‍ये प्रथमच बॅडमिंटनमध्‍ये पुरुष एकेरीमध्‍ये सुवर्ण कामगिरी केली.या वेळी राष्ट्रकुल स्पध्रेत भारताने एकूण 64 पदके जिंकली. यात 15 सुवर्णपदकांचा समावेश आहे. भारताने 30 रौप्य आणि 19 कांस्यपदके जिंकली. 2010 च्या दिल्ली राष्ट्रकुल स्पध्रेच्या तुलनेत या वेळी आपली कामगिरी निराशाजनक ठरली. दिल्लीत भारताने 101 पदके जिंकताना गुणतालिकेत दुसर्‍या स्थानी धडक दिली होती. मात्र, या वेळी दिल्लीच्या तुलनेत भारताच्या पदरी तब्बल 35 पदके कमी आली. शिवाय पदकतालिकेतही भारताची घसरण झाली. या वेळी भारताने नेमबाजीत एकूण 17 पदके जिंकली आहेत. यात चार सुवर्णपदकांचा समावेश आहे.

समारोपाच्या कार्यक्रमप्रसंगी महिला खेळाडू सीमा पुनिया भारतीय गटाची ध्वजवाहक होती. सीमा पुनियाने भारतासाठी थाळीफेकीत रौप्यपदक जिंकले होते. या स्पध्रेच्या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी नेमबाज विजयकुमार भारताचा ध्वजवाहक होता.
पुढील स्‍लाइडवर पाहा, समारोप समारंभातील निवडक छायाचित्रे...