आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Commonwealth Medal Winner Amit Dahiya Story News In Marathi

मातीच्‍या चुलीपासून ते मॉर्डन किचनपर्यंत, खेळामुळे हा पहिलवान झाला करोडपती!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोओळ - सरावा दरम्‍यान पहिलवान अमित दहिया)

नाहरी (सोनीपत) - राष्‍ट्रकुल स्‍पर्धेमध्‍ये सुवर्णपदक विजेता मल्‍ल अमित दहिया खेळामुळे करोडपती झाला आहे. लंडन ऑलिंम्पिक दरम्‍याने त्‍याची आई चुलीवर स्‍वयंपाक करायची, पावसाळ्यात घर गळायचे, एवढ्या प्रतिकुल परिस्थितीवर मात देऊन अमितने राष्‍ट्रकुल क्रिडास्‍पर्धेत पदक मिळवले आहे. आणि करोडपती झाला आहे.
अमितकडे पूर्वी दळणवळणसाठी गाडी नव्‍हती आता त्‍याच्‍याकडे मोटर सायकल आणि कार आहे. राष्‍ट्रकुल स्‍पर्धेत सुवर्ण पदक विजेत्‍याला एक कोटी रुपये देवून गौरविण्‍यात येणार असल्‍याचे राज्‍यसरकारने घोषित केले आहे.
आजही तोच स्‍वभाव
घरामध्‍ये एवढ्या सुविधा आल्‍या आहेत, तरीही अमितच्‍या आई-वडिलांचा स्‍वभाव पूर्वी जसा होता तसाच आहे. आजही ते पूर्वीचे पारं‍परिक पध्‍दतीचे कपडे परिधान करतात आणि तसाच व्‍यव्‍हार करतात. अमितचे वडिल बीडी पिताना म्‍हणाले की, नशिबाने चांगले दिवस आले आहेत. आणि अमितने एक चांगली ओळख दिली आहे.
आई-वडिलांचे स्‍वप्‍न साकार
अमितच्‍या आई-वडिलांकडे जमिनीचा तुकडा सुध्‍दा नव्‍हता. त्‍यांनी केलेल्‍या अथक परिश्रमाचे आज सार्थक झाल्‍याचे अमितच्‍या मामाने सांगितले.
पुढील स्‍लाइडवर पाहा, अमितच्‍या घराची तसेच आईची छायाचित्रे...