आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IBL vs IPL: बॅडमिंटन टॉपरला 71 लाख; क्रिकेटला होते 6 कोटी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- क्रिकेटमधील आयपीएलच्या धर्तीवर आता बॅडमिंटनमध्येही आयबीएल (इंडियन बॅडमिंटन लीग) स्पर्धा होत खेळवली जाणार आहे. सोमवारी पहिल्या टप्प्यात खेळाडूंचा लिलाव झाला. आयबीएल 14 ते 31 ऑगस्टदरम्यान 6 शहरांत खेळवली जाईल. सायना व मलेशियाची नंबर 1 खेळाडू सर्वात महागडी ठरली. दिग्गज खेळाडूंना त्यांच्या वकुबानुसार किंमत मिळाली नसल्याबद्दल माजी खेळाडू गोपीचंद यांनी आश्चर्य व्यक्त केले.

०क्रिकेटमधील टॉपर धोनीवर सहा कोटींची बोली लागली होती. बॅडमिंटनची टॉपर सायना नेहवालला 71 लाख मिळाले. वर्ल्ड नं.1 कोहलीला 6 कोटी मिळाले होते. बॅडमिंटनचा नं.1 खेळाडू ली चोंग वेईला 80 लाखच मिळाले.

०आयपीएलमध्ये 11.5
कोटींची सर्वाेच्च बोली गंभीरला लाभली होती. आयबीएलमध्ये मलेशियन वेईसाठी सर्वाेच्च बोली म्हणून 80 लाख मिळाले.

० आयपीएल-6मध्ये ऑस्ट्रेलियन
अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला 10 लाख डॉलरच्या सर्वाधिक मूल्याने खरेदी केले गेले होते. उलट आयबीएलमध्ये पुरस्कारांची
एकूण रक्कमच 10 लाख डॉलर्स आहे.

०आयपीएल-6च्या लिलावात 37 खेळाडूंना विकत घेण्यासाठी 64 कोटी खर्च झाले होते. आयबीएलमध्ये 6 संघ 9 कोटी रुपयेच खर्च करू शकतील.