आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Comparison Of Dhoni And Ex Captain Is Not Fair Says Sunil Gavaskar

माजी कर्णधारांशी धोनीची तुलना अयोग्‍य- गावसकर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- लोकांनी महेंद्रसिंह धोनीची माजी कर्णधारांशी तुलना न करता आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीमध्‍ये भारताला मिळालेल्‍या विजेतेपदाचा आनंद लुटाला पाहिजे, असे टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावसकर आणि काही माजी खेळाडूंनी म्‍हटले आहे.

धोनी जगातील एकमेव असा कर्णधार आहे, ज्‍याने आयसीसीच्‍या तिन्‍ही प्रकारात 50 षटकांचे विश्‍वचषक, टी-20 विश्‍वचषक आणि चॅम्पियन ट्रॉफीचे जेतेपद मिळवले आहे. जेव्‍हा गावसकर यांना धोनी सर्वश्रेष्‍ठ कर्णधार आहे काय असे विचारले असता, त्‍यांनी अशी तुलना करणे योग्‍य नसल्‍याचे म्‍हटले.

ते म्‍हणाले, वेगवेगळया पिढींची तुलना केली नाही पाहिजे. प्रत्‍येकाच्‍या वेळची परिस्थिती वेगळी होती. त्‍यामुळे त्‍याची तुलना करणे योग्‍य नाही. निश्चितपणे तो भारताच्‍या सर्वश्रेष्‍ठ कर्णधारांपैकी एक आहे. याबाबत त्‍यांनी सांगितले, त्‍याने भारताला कसोटीतील नंबर एकची टीम बनवले. 2011 चा विश्‍वचषक, 2007 साली टी-20 विश्‍वचषकाचे जेतेपद आणि आता चॅम्पियन्‍स ट्रॉफी. आपल्‍याला तुलनेपेक्षा याचा आनंद लुटता आला पाहिजे. गावसकरांच्‍या या मतास माजी फलंदाज अजय जडेजानेही सहमती दर्शवली.