आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Comparison With Dravid Is Good For Me Says Cheteshwar Pujara

द्रविडशी तुलनेने माझे मनोबल वाढते- चेतेश्‍वर पुजारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- कसोटी टीममध्‍ये तिस-या स्‍थानावर येऊन राहुल द्रविडची जबाबदारी आपल्‍या खांद्यावर सक्षमपणे पेलणे आणि लहानपणापासून ज्‍याचा आदर्श आहे. त्‍याच्‍याशी तुलना होणे माझे मनोबल वाढवणारे आहे, असे टीम इंडियाचा उभरता फलंदाज चेतेश्‍वर पुजाराने म्‍हटले आहे.

पुजारा म्‍हणाला, द्रविड हा एक यशस्‍वी फलंदाज होता. टीम इंडियामध्‍ये त्‍याला 'द वॉल'ची उपमा देण्‍यात आली होती. जर माझी तुलना त्‍याच्‍याशी होत असेल तर हे माझे मनोबल वाढवणारे आहे. यामुळे माझ्या आत्‍मविश्‍वासातही वाढ होते. द्रविड लहानपणापासून माझा आदर्श होता. मी त्‍याच्‍याकडूनच जास्‍तीत जास्‍त शिकण्‍याचा प्रयत्‍न करीत असतो. दुर्दैवाने द्रविडने निवृत्ती घेतली आहे. त्‍याची मला कायम साथ मिळाली आहे. त्‍याने मला अनेक बारकावे शिकवले आहेत.

पुजाराने 13 कसोटीत चार शतके केली आहेत. यामध्‍ये दोन द्विशतकांचाही समावेश आहे. तसेच तीन अर्धशतकेही त्‍याने ठोकली आहेत. सध्‍या त्‍याची सरासरी 65 इतकी आहे.