आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Competing In 800m Race While She Was Seven Months Pregnant Gives Birth To Baby Girl

या सात महिन्‍याच्‍या गर्भवतीने 2:32 मिनिटामध्‍ये पूर्ण केली 800 मीटर धावण्‍याची शर्यत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(गर्भवती असताना वर्कआउट करताना अमेरिकेची एलीसिया मोन्‍टानो)
न्‍यूयार्क - दोन महिन्‍यापूर्वी क्रिडाजगतामध्‍ये एक आश्‍चर्यकारक घटना घडली. सात महिन्‍याची गर्भवती महिला धावपटू युएस अ‍ॅथलेटिक चॅम्पियनशिपमध्‍ये दोन मिनिट 32 सेकंदात 800 मीटर धावली. त्‍यानंतर दोनच महिन्‍यामध्‍ये तिने एका गोंडस मुलास जन्‍म दिला.
28 वर्षीय मोन्‍टानो आणि लुईस यांचे लग्‍न 2011 मध्‍ये झाले. मोन्‍टानोने इंस्‍टाग्रामवर मुलासह स्‍वत:चे छायाचित्र पोस्‍ट केले आहे. ''मी आणि माझे बाळ सुखरुप आहोत, आपल्‍या सर्वांचे आभार'', असेही तिने सोशल साइट्सवर पोस्‍ट केले.

सात महिन्‍याची गर्भवती असताना 2:32:13 मिनीटात पुरी केली शर्यत
एलीसिया मोन्‍टानो सात महिन्‍याची गर्भवती असताना धावली आणि 2:32:13 मिनीटामध्‍ये रेस पूर्ण केली. एलिसिया पाच वेळा युएस आउटडोर अॅथलेटिक्‍सची चॅम्पियन राहिली आहे. शर्यतीविषयी ती म्‍हणाली, ''मी गर्भवती असतानासुध्‍दा स्‍वत:ला कायम सतर्क ठेवले. आणि स्‍पर्धेदरम्‍यान मी माझा पुर्ण परफॉम दिला. ''
कोण आहे मोन्‍टानो ?
एलीसिया मोन्‍टानो अमेरिकेची मिडल डिस्‍टेंस धावपटू आहे. आतापर्यंत ती युएस आउटडोर अॅथलेटिक्‍स चॅम्पियनशिपची पाच वेळा विजेती आहे. सर्वांत प्रथम ती 2005 मध्‍ये चॅम्पियनशिप जिंकली होती. त्‍यानंतर 2010, 2011, 2012 आणि 2013 मध्‍ये ती चॅम्पियन राहिली आहे.

पुढील स्‍लाइडवर पाहा, मोन्‍टानाची छायाचित्रे...