आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Confedaration Cup Of Football: Brazil Entered In Semifinal

कॉन्फेडरेशन चषक फुटबॉल: ब्राझील उपांत्य फेरीत दाखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साल्वाडोर - वर्ल्ड चॅम्पियन ब्राझीलने कॉन्फेडरेशन चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. या टीमने रविवारी विजयाची हॅट्ट्रिक केली. यजमान संघाने स्पर्धेतील अ गटाच्या उपांत्यपूर्व लढतीत इटलीवर 4-2 अशा फरकाने विजय मिळवला. यासह ब्राझीलने अंतिम चारमधील स्थान मिळवले.


इटलीने झुंजवले
पाहुण्या इटलीने यजमान संघाला सामन्यात गोलचे खाते उघडण्यासाठी तब्बल 45 मिनिटे झुंजवले. दरम्यान, ब्राझीलने गोलसाठी चार वेळा केलेला प्रयत्न अपयशी ठरला. अखेर, 45 व्या मिनिटाला बोफिम डॅँटेने यजमानांकडून पहिला गोल केला. मात्र, ही आघाडी ब्राझीलला फार काळ कायम ठेवता आली नाही. दरम्यान, गिआचेरीनीने 51 व्या मिनिटांला गोल करून इटलीला 1-1 ने बरोबरी मिळवून दिली.
नेयमार, फ्रेड चमकला


लढत बरोबरीत असतानाच अवघ्या चार मिनिटांत नेयमारने ब्राझीलला 2-1 ने आघाडी मिळवून दिली.
हेर्नांडेझचे दोन गोल; मेक्सिको विजयी
दुसरीकडे हेर्नांडेझने (54, 66 मि.) दोन गोल करून अ गटात मेक्सिकोला विजय मिळवून दिला. या संघाने रोमांचक लढतीत जपानवर 2-1 ने मात केली. जपानकडून ओकाझस्कीने 86 व्या मिनिटाला एकमेव गोल केला.