आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Confederation Cup ; Urugwe, Spain Reach In Semifinal

कॉन्फेडरेशन फुटबॉल चषक : उरुग्वे, स्पेन उपांत्य फेरीत दाखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेसिफे - हेर्नांडेझने चार गोल करून उरुग्वे संघाचा कॉन्फेडरेशन चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम चारमधील प्रवेश निश्चित केला. या संघाने ब गटाच्या उपांत्यपूर्व लढतीत ताहितीवर 8-0 अशा फरकाने मात केली. पेरेझ (27मि.), लोड्रेइरो (61मि.) व जुआन सुआरेझ (82,90मि.) यांनी सुरेख गोल करून संघाच्या एकतर्फी विजयात मोलाचे योगदान दिले.


सामन्याच्या दुस-या मिनिटाला हेर्नांडेझने उरुग्वेकडून गोलचे खाते उघडले. त्याने ताहितीचा गोलरक्षक गिलबर्ल्ट मेरियलला हुलकावणी देऊन गोल करण्यात यश मिळवले. त्यानंतर त्याने 22 मिनिटांनी संघाच्या आघाडीला 2-0 ने मजबूत केले. त्याने 24 व्या मिनिटाला ही उल्लेखनीय कामगिरी केली. त्यापाठोपाठ अवघ्या तीन मिनिटांत पेरेझने गोल करून संघाला 3-0 ने आघाडी मिळवून दिली. दरम्यान, 45 व्या मिनिटाला हेर्नांडेझने वैयक्तिक तिसरा आणि संघाकडून चौथा गोल केला. दुस-या हाफमध्येही उरुग्वे संघाने सामन्यातील आपला गोलचा सपाटा कायम ठेवला. या वेळी ताहितीने सामन्यात पहिला गोल करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले.मात्र, प्रतिस्पर्धी टीमच्या गोलरक्षकाने हा प्रयत्न हाणून पाडला. दरम्यान, लोडेइरोने 61 मिनिटाला गोल केला. त्यानंतर 67 व्या मिनिटाला पेनॉल्टी कार्नरला हेर्नांडेझने वैयक्तिक चौथा गोल केला. त्यानंतर सुआरेझने 82 व 90 व्या मिनिटाला गोल करून उरुग्वे संघाचा सामन्यात मोठ्या फरकाने विजय निश्चित केला.


अशा होणार उपांत्य लढती
नायजेरियाला नमवून स्पेनने अंतिम चारमधील प्रवेश निश्चित केला. आता या संघाची उपांत्य लढत इटलीसोबत होईल. तसेच ब्राझील व उरुग्वे यांच्यात ब गटातील उपांत्य सामना खेळवला जाईल.


स्पेनचा 3-0 ने एकतर्फी विजय
स्पेनने ब गटाच्या उपांत्यपूर्व लढतीत नायजेरियाचा 3-0 ने पराभव केला. अल्बा (3, 88 मि.) आणि टोरेस (62 मि.) यांनी गोल करून संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. या विजयासह स्पेनने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.