आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉन्फेडरेशन फुटबॉल चषक: स्पेनचा विक्रमी विजय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिओ दि जानेरिओ - स्पेनने कॉन्फेडरेशन चषक फुटबॉल स्पर्धेत ताहितीवर 10-0 ने मात केली. फर्नांडो टोरेस(5,33,57,79 मि.), सिल्व्हा (31,89मि.), व्हिलाने (39, 49, 64 मि.) गोल करून स्पेनला विक्रमी विजय मिळवून दिला.


सामन्याच्या पाचव्या मिनिटाला फर्नांडो टोरेसने स्पेनकडून गोलचे खाते उघडले. त्यानंतर डेव्हिड सिल्व्हाने 31 व्या मिनिटाला स्पेनच्या आघाडीला 2-0 ने मजबूत केले. त्यापाठोपाठ दोन मिनिटांत टोरेसने वैयक्तिक दुसरा व संघाकडून तिसरा गोल केला. डेव्हिड व्हिलानेही 39 व्या मिनिटाला गोल केला. डेव्हिड व्हिलानेही 39 व्या मिनिटाला गोल केला. स्पेनने मध्यंतरापूर्वी या गोलच्या बळावर सामन्यात 4-0 ने आघाडी घेतली.