आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर घडला नसता सचिन, जाणून घ्‍या खास गोष्‍टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकरच्‍या कारकिर्दीतील अखेरचा कसोटी सामना मुंबईत सुरु झाला आहे. खास बाब म्‍हणजे, सचिन फलंदाजीला उतरला असून तो पहिल्‍या दिवशी 38 धावांवर नाबाद आहे. शुक्रवारी सामन्‍याच्‍या दुस-या दिवशी तो मैदानावर फलंदाजीला उतरणार आहे. सचिनला फलंदाजी करताना पाहण्‍याची ही कदाचित शेवटची संधी असू शकते. कारण, भारताने या सामन्‍यात मोठी आघाडी घेतल्‍यास वेस्‍ट इंडिजला डावाने मात देणे शक्‍य आहे. त्‍यामुळे दुस-या डावात सचिनला फलंदाजीची संधी मिळण्‍याची शक्‍यता कमीच आहे. सचिनने वयाच्‍या चौदाव्‍या वर्षापासून क्रिकेट खेळण्‍यास सुरुवात केली. आतापर्यंत कारकिर्दीत त्‍याने अनेक उतार-चढाव पाहिले. खराब फॉर्म, दुखापतींनी सचिनलाही हैराण केले. परंतु, प्रत्‍येक वेळेस त्‍याने दमदार कमबॅक केले. कसोटी आणि वन डे क्रिकेटमध्‍ये सचिनच्‍या नावावर सर्वाधिक धावा आणि शतक ठोकण्‍याचा विक्रम आहे. सचिनच्‍या कामगिरीची बरोबरी करणे नजिकच्‍या काळात तरी कोणालाही शक्‍य नाही.

सचिनने जे साध्‍य केले त्‍यामागे अनेक वर्षांचा कठोर परिश्रम आहे. सचिनने कारकिर्दीमध्‍ये मिळविलेल्‍या यशामागे मोठा संघर्ष आहे. हिमालयाप्रमाणे असलेल्‍या या कारकिर्दीमागे अनेक लहानमोठ्या गोष्‍टींचा वाटा आहे. कुटुंब, मित्र या सर्वांनी मिळून सचिनला सचिन बनविले आहे.

आता सचिन तेंडुलकर थांबणार आहे. आम्‍ही सचिन तेंडुलकरच्‍या आयुष्‍यातील काही खास क्षण तुमच्‍यासाठी घेऊन आलो आहोत... कदाचित या योगदानाशिवाय सचिन घडलाही नसता... क्लिक करा पुढील स्‍लाईड्सवर..