आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाओमी कॅम्‍पबेलसह डझनावरी मुलींसोबत मजा मारायचा टायसन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- कमी वयात बॉक्सिंगचा वर्ल्‍ड चॅम्पियन बनलेल्‍या माईक टायसनने 'अनडिस्‍प्‍युटेड ट्रूथ' या आत्‍मचरित्र्यातून आयुष्‍यातील अनेक पैलू जगासमोर आणले आहेत. त्‍यातील अनेक गोष्‍टी खळबळजनक आहेत. एकीकडे त्‍याने लहानपणी सहन केलेल्‍या यातना त्‍याच्‍याबद्दल सहानुभूती निर्माण करतात. तर, दुसरीकडे जग जिंकल्‍यानंतर डोक्‍यात गेलेल्‍या नशेमुळे त्‍याने इतरांना दिलेल्‍या यातना त्‍याच्‍याबद्दल तिटकारा निर्माण करतात.

टायसनने बॉक्सिंगमध्‍ये मोठे नाव कमाविले. परंतु, त्‍याच्‍या खासगी आयुष्‍याने त्‍याला क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठा 'बॅड बॉय' बनविले. काही काळापूर्वी मृत्‍यूच्‍या दारात उभा असल्‍याच्‍या दावा करणा-या टायसनने या पुस्‍तकानंतर पुन्‍हा एकदा क्रीडा क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे.

पुस्‍तकात एक किस्‍सा लिहीला आहे. प्रसिद्ध अभिनेता ब्रॅड पिट टायसनला प्रचंड घाबरात होता. यामागचे कारण म्‍हणजे, टायसनची पहिली पत्नी रॉबिन आणि ब्रॅड पिट यांचे अफेअर होते. टायसनने दोघांना नशेत टल्‍ली अवस्‍थेत हॉटेलमध्‍ये एकत्र पकडले होते. टायसनकडून मार खाण्‍याची पिटला प्रचंड भिती होती.

टायसनने पुस्‍तकातून भविष्‍यातील योजनाही सांगितली आहे. पुढील वर्षी इंग्‍लंडमध्‍ये तो एकपात्री शो लॉंच करणार आहे. या कार्यक्रमाचे तिकीट 50 पाऊंड राहणार आहे.

पुढील स्‍लाईड्सवर क्लिक करा आणि वाचा टायसनने केलेले खळबळजनक खुलासे...