आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॅम्पियन्स ट्रॉफी : कुकला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची खात्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर इंग्लंडची टीम उत्साहात आहे. आमचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकेल, असा विश्वास इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलेस्टर कुकने व्यक्त केला आहे. इंग्लंडने उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेसारख्या मजबूत संघाला 7 विकेटने हरवले होते. ‘मला खात्री आहे की रविवारी होणा-या फायनलनंतर ट्रॉफी आमच्या खेळाडूंच्या हाती असेल. आम्ही अशी कामगिरी करू शकतो. मला माझ्या संघावर पूर्ण भरवसा आहे,’ असे कुकने या वेळी म्हटले. फायनलमध्ये आमच्या टीमला आता सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करायचे आहे. फायनलमध्ये पोहोचणे हे मोठे यश आहे. आमच्या संघाने येथे पोहोचण्यासाठी कठीण प्रयत्न केले, असे तो म्हणाला.