आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

... तर यासाठी गुरू, विंदू, श्रीसंतने कबूल केला गुन्‍हा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलमध्‍ये स्‍पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीच्‍या 'खेळा'वर गोंधळ सुरू आहे. याप्रकरणी अटक करण्‍यात आलेल्‍या संशयितांनी आपल्‍या गुन्‍हा कबूल केला आहे. मात्र, आतापर्यंत कोणाविरूद्धही कडक कारवाई करण्‍यात आलेली नाही. हे प्रकरण पहिल्‍यांदा बाहेर आल्‍यानंतर सर्वात प्रथम श्रीसंतसह इतर खेळाडूंनी आपला गुन्‍हा कबूल केला. मग विंदू दारासिंग, गुरूनाथ मयप्‍पन आणि राज कुंद्रानेही आपला यात हात असल्‍याचे मान्‍य तर केलेच शिवाय सट्टेबाजी करून आम्‍ही काहीही चूकीचे केले नसल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले. शेवटी याचे काय कारण आहे, की एवढया मोठया प्रकरणात सामील असूनही या आरोपींनी आपला गुन्‍हा मान्‍य करण्‍यास जराही वेळ लावला नाही ?

त्‍यामुळे आता भारतात सट्टेबाजीच्‍या कायद्याकडे लक्ष देण्‍याची गरज भासतेय. भारतात सट्टेबाजीच्‍या कायद्यास मान्‍यता नाही. मात्र, विंदू दारासिंगचे वकील सतीश मानेशिंदे यांनी कबूल केले आहे की, विंदू सट्टेबाजीमध्‍ये सामील होता. पण बॉम्‍बे प्रिव्‍हेन्‍शन ऑफ गॅम्‍बलिंग एक्‍ट 1887 आणि इतर कायद्यांप्रमाणे सट्टेबाजीत सामील होणे कोणताही गुन्‍हा नाही. मानेशिंदेंनी 1996 मध्‍ये के. आर. लक्ष्‍मण विरूद्ध तामिळनाडू राज्‍यसरकार प्रकरणी कोर्टाने दिलेल्‍या निर्णयाचा हवाला देत भारतात खेळावर सट्टा लावण्‍याचा गुन्‍हा नसल्‍याचे म्‍हटले आहे. इतर तज्‍ज्ञ, प्रसिद्ध कायदेतज्‍ज्ञ इतकेच काय फिक्‍कीनेही भारतात खेळामध्‍ये सट्टेबाजी गुन्‍हा नसल्‍याचे म्‍हटले आहे. क्रिकेटमध्‍ये सट्टेबाजीसाठी एखाद्याला शिक्षा देणे कठीण आहे. त्‍याशिवाय देशात आतापर्यंत सट्टेबाजांना शिक्षा होण्‍याचे कुठलीच घटना समोर आलेले नाही.

अधिक माहिती जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...