आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Could Sachin Tendulkar Possible To Play In Champions League

चॅम्पियन्स लीगमध्ये सचिन तेंडुलकर खेळणार?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सचिन तेंडुलकरने आयपीएलमधून निवृत्ती स्वीकारली असली तरीही येत्या 17 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या कालावधीत भारतात होणार्‍या चॅम्पियन्स लीग क्रिकेट स्पर्धेत तो खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सचिन तेंडुलकरने आयपीएलमधून निवृत्ती स्वीकारली असली तरीही यंदाच्या वर्षी चॅम्पियन्स लीगमध्ये खेळावे, अशी विनंती त्याला मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाने केल्याचे कळते.

सचिनला या स्पर्धेचा दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी क्रिकेट दौर्‍यासाठी लाभ होणार आहे का, हा मोठा प्रश्न आहे. सध्या मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाने खूपच दडपण आणले तरच तो खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.