आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्वात महागड्या खेळाडूवर खटला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क यांकीजचे अ‍ॅलेक्स रॉड्रिग्ज आणि 13 इतर बेसबॉल खेळाडूंना उत्तेजक द्रव्य घेण्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. खेळाडूंना शक्तिवर्धक औषधे पुरवठा करणारे क्लिनिकला टाळे ठोकण्यात आले आहे. सर्व प्रकरणाचा तपास फेडरल एजन्सी करत आहे. 38 वर्षीय रॉड्रीग्जने आपल्या क्लबमधून 2007 मध्ये 27.50 कोटी डॉलरचा करार केला होता. बेसबॉल एखाद्या खेळाडूला दिली गेलेली सर्वाधिक रक्कम आहे. रॉड्रीग्जने फेब्रुवारी 2009 मध्ये स्टिरॉइड घेतल्याचे कबूल केले होते. त्याच्या 211 सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे.

त्याच्यावर घातलेल्या सामना बंदीविरोधात रॉड्रीग्जने अपील दाखल केले आहे. 211 सामन्यांवर बंदी घातल्यामुळे त्याला वेतनापोटी तीन कोटी 40 लाख डॉलरचे नुकसान सोसावे लागेल. निर्णयाला आव्हान देणारा रॉड्रिग्ज एकमेव खेळाडू आहे. निलंबित केलेल्या 13 इतर खेळाडूंनी 50 सामन्यांच्या बंदी मान्य केली आहे.