आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Court Declares 4 Names Out Of 13 In IPL Spot Fixing Issue

स्पॉट फिक्सिंग : श्रीनि, मयप्पन, कुंद्रा दाेषी; २४ खेळाडू रडारवर, कोर्टाने 4 नावे केली जाहीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आयपीएलमधील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या न्यायमूर्ती मुकुल मुद्गल समितीने दिलेल्या अहवालात बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन, त्यांचे जावई गुरुनाथ मयप्पन, आयपीएल चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सुंदर रमन आणि राजस्थान रॉयल्सचे सहमालक राज कुंद्रा यांच्या नावाचा समावेश आहे. २०१३ च्या मे महिन्यात आयपीएल सामन्यांमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणांसंदर्भात भ्रष्टाचाराबाबत श्रीनिवासन, मयप्पन, सुंदर रमन आणि राज कुंद्रा यांची चौकशी करण्यात आल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आज बीसीसीआयला येत्या २० नोव्हेंबर रोजी चेन्नई येथे होणा-या निवडणुका हंगामी कालावधीसाठी रोखण्याचे आदेश दिल्याचे कळते. मुद्गल समितीच्या अहवालाची प्रत राज कुंद्रा व मयप्पन यांच्या वकिलांना देण्यात आली. बीसीसीआय व श्रीनिवासन यांचे वकीलही सुनावणीच्या वेळी न्यायालयात हजर होते. न्यायालयाने श्रीनिवासन, मयप्पन, सुंदर रमन व राज कुंद्रा या चौघांना अहवालातील टिप्पणीबाबत आपल्या हरकती येत्या चार दिवसांत सादर करण्याचे आदेशही दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाची या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या २४ नोव्हेंबर रोजी होणार आहे. चौकशी करण्यात आलेल्या क्रिकेटपटूंपैकी तिघांची नावे स्पष्ट करण्यात आली.
श्रीनिवासन यांना निवडणूक लढवण्यास नकार : स्पाॅट फिक्सिंग प्रकरणाची चाैकशी पूर्ण हाेईपर्यंत श्रीनिवासन यांना निवडणूक लढवण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे त्यांचा भ्रमनिराश होण्याची शक्यता आहे.

हे तर नाटकातले गैरकलाकार आहेत : न्यायालय
‘हे चाैघेही फिक्सिंगच्या नाटकातील गैरखेळाडू कलाकार आहेत. या सर्वांच्याविरुद्ध सबळ पुरावे आहेत. या प्रकरणातील सर्व जणांची नावे लवकरच जाहीर केली जातील. यातूनच या प्रकरणाचा तपास पूर्ण हाेईल. - न्या. टी. एस. ठाकूर, न्यायाधीश एफ.एम. कलिफुल्ला.
कोर्टाने जाहीर केलेली नावे
एन. श्रीनिवासन
आयसीसी आणि बीसीसीआयचे अध्यक्ष. आयपीएल टीम चेन्नई संघाचे मालक.
आरोप : जावई मयप्पनच्या फिक्सिंग प्रकरणातील सहभागाची माहिती दडवली.
सर्वाधिक टीका श्रीनिवासन यांच्यावर झाली आहे. निवडणूक लढवण्यावर गदा आल्याने बीसीसीआय व आयसीसीच्या अध्यक्षपदाला मुकले जाणार.
गुरुनाथ मयप्पन
श्रीनिवासन यांचे जावई. चेन्नई संघाचे पदाधिकारी. तुरुंगवासही घडला आहे.
आरोप सट्टेबाजांना संघाची माहिती दिली. बिंदूसाेबत चर्चा केल्याचा टेपमध्ये आवाज असल्याचे स्पष्ट.
राज कुंद्रा
राजस्थान संघाचे सहमालक. बीसीसीआयने चाैकशीत क्लीन चिट दिली हाेती.
आराेप श्रीसंत, अंकित आणि चांदिलाच्या अटकेनंतर सट्टेबाजांशी संबंध असल्याचे समाेर आले हाेते.

सुंदर रमन
आयपीएलचे सीईआे. गावसकर यांनी त्यांच्यासाठी सकारात्मक मत मांडले.
आराेप आयपीएलचे स्पाॅट फिक्सिंग आणि सट्टेबाजीत सक्रिय असणा-यांची माहिती दडवून ठेवली.
दाेन संघ धाेक्यात
मयप्पन-कुंद्रा हे दाेषी असल्याचे उघड झाल्यास राजस्थान आणि चेन्नई संघांची मान्यता रद्द हाेऊ शकते. चेन्नई टीमचा कर्णधार धाेनीवरही गदा येण्याची शक्यता आहे.
टाेटल रिकाॅल
आयपीएल-६ मधील स्पाॅट फिक्सिंग प्रकरण मे २०१३ मध्ये उघडकीस आले.
श्रीसंतसह अनेक खेळाडूंना अटक.
मयप्पनचे नाव समाेर आले. क्रिकेट मंडळाने चाैकशीत क्लीन चिट दिली.
हे प्रकरण सर्वाेच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने मुद्गल समिती स्थापन केली.
समितीने ३ नाेव्हेंबरला दिला अहवाल.
बीसीसीआयच्या बैठकीवर गदा!
येत्या २० नाेव्हेंबर राेजी बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण बैठक हाेणार हाेती. न्यायालयाच्या आदेशामुळे आता ही बैठक येत्या दाेन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. श्रीनिवासन यांचे वकील कपिल सिब्बल यांची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली.
लवकरच इतर नावे जाहीर!
अहवालात समावेश असलेल्या १३ पैकी चार जणांची नावे जाहीर करण्यात आली. आता उर्वरित नऊ जणांची नावे लवकरच जाहीर केली जातील, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या नावांशिवाय या अहवालावरची सुनावणी पूर्ण हाेणार नाही, असेही न्यायालयाने सांगितले.
पाच खेळाडूंची नावे !
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धाेनीच्या चेन्नई सुपरकिंग्जसह सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या राजस्थान राॅयल्स संघातील पाच खेळाडूंच्या नावांचाही समावेश आहे. यात एका भारतीय खेळाडूच्या नावाचाही समावेश असल्याची चर्चा आहे.
आता पुढे काय? पाच दिग्गजांची नावे समाेर येण्याची शक्यता!
अयाज मेमन (क्रिकेट विश्लेषक)
येत्या २४ नाेव्हेंबर राेजी श्रीनिवासन, कुंद्रा, आयपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर रामन आणि गुरुनाथ मयप्पनला सर्वाेच्च न्यायालयात आपली बाजू मांडावी लागणार आहे. यादिवशी क्रिकेटमध्ये सर्वात माेठा गाैप्यस्फाेट हाेण्याची शक्यता आहे. स्पाॅट फिक्सिंगप्रकरणी एकूण १३ जणांवर आराेप आहेत. यातील तीन नावे ही न्यायालयासमाेर आली आहेत. या अहवालातील यादीत अशा पाच क्रिकेटपटूंच्या नावांचा समावेश आहे, ज्याने क्रिकेटच्या विश्वात खळबड उडू शकते. यातील सर्वाधिक खेळाडू हे चेन्नई आणि राजस्थान संघाचे असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
नुकतीच चार नावे समाेर आली. मात्र, यांना दाेषी म्हणणे चुकीचे ठरेल. कारण, चाैकशीदरम्यान आलेल्या संशयातून अनेक नावे समाेर येतात. शुक्रवारी न्यायालयाने याच आधारे तीन खेळाडूंनी नावे उघड करण्यास मनाई केली आहे. या प्रकरणात भारतीय खेळाडूंचीही नावे असल्याची चर्चा आहे. याचा आॅस्ट्रेलिया दाैरा व वर्ल्डकपवर परिणाम पडू शकताे. मयप्पन-बिंदू आणि कुंद्रा-बिंदू यांच्यातील सवांदाच्या टेपमधूनही चर्चेचे स्पष्ट झाले आहे. श्रीनिवासन यांंची वाट बिकट आहे. त्यांचे आयसीसी आणि बीसीसीआयचे अध्यक्षपद धाेक्यात येण्याची शक्यता आहे.