आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crazy Spectators Of India Vs Pakistan Match World Cup 2015

India vs Pakistan : दोन्ही देशांच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये जबरदस्त उत्साह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅडिलेडच्या मैदानावर विश्वचषक स्पर्धेतील भारत पाकिस्तान दरम्यानचा सामना सुरू आहे. या सामन्यासाठी चाहत्यांमध्ये मोठा उत्साह असल्याचे दिसून आले आहे. सामन्यासाठी मैदान चाहत्यांनी गच्च भरलेले असल्याचे दिसून आले आहे.

सामन्यासाठी जेव्हा भारतीय संघ मैदानावर आला, त्यावेळी भाराताच कर्णधार महेंद्रसिंग धोनी सर्वात आधी तर विराट सर्वात शेवटी बसमध्ये चढला. भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांनी तर सकाळपासूनच मैदानावर गर्दी केली होती.

गेल्यावेळी 98 कोटी चाहत्यांनी पाहिला सामना
हा सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांचा जगभरातील आकडा पाहता हा सर्वात मोठा सामना ठरू शकतो. विविध माध्यमांद्वारे सुमारे एक अब्ज लोक हा सामना पाहणार आहेत. याआधी 2011 मध्ये मोहाली येथे झालेला भारत-पाकिस्तानचा सामना 98 कोटी लोकांनी पाहिला आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, भारत-पाकच्या चाहत्यांचे Photo...