आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Cricket Board Relax The Permission Kay Pyo Chchhe

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘काय प्यो च्छे’ला क्रिकेट बोर्डाच्या परवानगीची ढील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ईडन गार्डन्स, कोलकाता येथील 2001 च्या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऐतिहासिक कसोटी सामन्यातील काही रोमहर्षक क्षणांची ‘काय प्यो च्छे’ या चित्रपटात वापर करण्याची परवानगी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दिल्यामुळे या चित्रपटाचे डायरेक्टर अभिषेक कपूर यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

‘थ्री इडियट्स’ फेम चेतन भगत यांच्या ‘द थ्री मिस्टेक्स ऑ फ माय लाइफ’ या कादंबरीवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे कथानक ईशान, ओमी आणि गोविंद या महत्त्वाकांक्षी आणि यशासाठी आसुसलेल्या तीन तरुण मित्रांभोवती गुंफले गेले आहे. 2000 च्या सुमारास नव्या शतकाच्या आगमनाने भारताच्या अणुशक्तीमधील प्रगतीमुळे अहमदाबादमधील या तीन तरुण मित्रांनाही श्रीमंत व प्रसिद्ध होण्यासाठी काहीतरी करून दाखवण्याची इच्छा आहे. क्रिकेट हा ज्या देशात धर्माप्रमाणे आहे, त्याच खेळात काहीतरी करून दाखवण्याची योजना या तिघांच्या टाळक्यात शिजते. क्रिकेट प्रशिक्षक अकॅडमी स्थापन करून भारताचे भावी सुपरस्टार क्रिकेटपटू घडवण्याची योजना ते आखतात. नंतर ज्या घटना तिघांच्या जीवनात घडत जातात, त्या घटना त्यांच्या आयुष्यातील एक साहसी, थरारक आणि नवे अनुभव देणा-या ठरतात.

‘क्रिकेट’ हा त्यातील एक महत्त्वाचा घटक असल्यामुळे फॉलोऑ न स्वीकारल्यानंतर भारताने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा परिणाम, प्रभाव या तिघांवर मोठ्या प्रमाणावर होतो.

व्हीव्हीएस लक्ष्मणची 281 धावांची अजरामर खेळी, राहुल द्रविडची शतकी फलंदाजी, हरभजनसिंगची हॅट्ट्रिक आणि सचिन तेंडुलकरची भेदक लेग स्पिन-गुगली गोलंदाजी यामुळे गाजलेल्या त्या भारत विजयाच्या कसोटीची काही क्षणचित्रे चित्रपटासाठी अभिषेक कपूर यांना हवी होती. अखेर बीसीसीआयने त्यासाठी परवानगी दिली आहे.
बीसीसीआयने परवानगी दिली नाही तर त्या सामन्यातील क्षणांचे डमी चित्रीकरणही करण्यात आले होते. परवानगी मिळाल्यामुळे आता ते चित्रण दाखवावे लागणार नाही.

क्रिकेट हा या चित्रपटाच्या कथानकाचा गाभा असल्यामुळे आम्हाला सामन्यातील काही प्रत्यक्ष घडलेले क्षण हवे होते, असे स्टुडिओ डिस्नेचे क्रिएटिव्ह डायरेक्टर मनीष हरिप्रसाद यांनी सांगितले. 22 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.